शैक्षणिक
यवतमाळ येथे ओबीसी शिक्षक कर्मचारी,अधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक
ओबीसी समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन : शशिकांत लोळगे
यवतमाळ : ओबीसी समाजाच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे 12 जानेवारी रविवार दुपारी 12 वा. ओबीसी शिक्षक-अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित केली आहे.
या बैठकीत ओबीसी समाजातील अधिकारी, कर्मचारी,शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. ओबीसी बांधवांच्या अनेक समस्या आहे या समस्येवर तोडगा काढण्याकरिता चर्चा होणार आहे. याशिवाय, संघटनेच्या कार्यकारिणीचा विस्तारही करण्यात येणार आहे.
सर्व ओबीसी समाज बांधवांनी या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष शशिकांत लोळगे (9834493413) यांनी केले आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1