यवतमाळमध्ये जिजाऊ जयंती २०२५: भव्य उत्सव आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
यवतमाळ / प्रतिनिधी
12 जानेवारी 2025:
राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ शहरात छत्रपती सेवा प्रतिष्ठान आणि मराठा सेवा संघाच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ जन्मोत्सवाचा भव्य उत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ‘शिवतीर्थ’,छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर,गार्डन रोड,बस स्टॅन्ड जवळ होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 9 वाजता जिजाऊ वंदना आणि अभिवादनाने होईल.यानंतर दिवसभर विविध सांस्कृतिक आणि कलात्मक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
कार्यक्रमाला लघिमा तिवारी (मुख्याधिकारी,न.प.),शिवश्री डॉ.योगेश देशमुख (तहसीलदार),गोपाळ देशपांडे (उपविभागीय अधिकारी),यशोधरा मुनेश्वर (पोलीस निरीक्षक),डॉ.योगेश देशमुख तहसिलदार,यवतमाळ,ज्ञानोबा देवकते पोलीस निरिक्षक-जि.वा.शा.यवतमाळ,ओमप्रकाश नगराळे सहआयुक्त, इ.मा.ब.क.यवतमाळ,नरेश रणधीर पोलीस निरिक्षक,यवतमाळ,दिनेश बैसाने उपविभागीय पोलीस अधिकारी, यवतमाळ,सतिष चवरे पोलीस निरिक्षक-स्था.गुन्हे शा.यवतमाळ,रामकृष्ण जाधव पोलीस निरिक्षक,यवतमाळ,संजय पवार पोलीस निरिक्षक,यवतमाळ आणि इतर मान्यवर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सर्व शिवप्रेमींनी,जिजाऊंच्या विचारांना मानणाऱ्या नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
🚩माऊली.