अपघात
कार झाडावर आदळली ; एकाचा मृत्यू तिघे जखमी
कार झाडावर आदळली ; एकाचा मृत्यू तिघे जखमी
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
काल मध्यरात्री कार झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर तीन तरुण जखमी झाले आहेत. गणेश गजानन शेळके वय 22 रा. जळगाव आर्वी असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
मृतक गणेश याचा भाऊ जगदीश शेळके याने दिलेल्या तक्रारी नुसार तो जळगाव आर्वी येथे राहतो. आणि शेती काम करतो त्याचे शेजारी त्याचा चुलत भाऊ नामे गणेश गजानन शेळके वय 22 वर्ष हा राहत असुन धामणगाव रेल्वे येथे माउली झेरॉक्सचे दुकॉन चालवितो व फोटोग्राफी व्यवसाय करतो.काल दिनांक 11/01/2025 रोजी रात्री 12/55 वा त्याला त्याचा मीत्र अनिकेत धोटे याचा फोन आला व त्याने सांगीतले कि तुझा भाऊ गणेश गजानन शेळके याचा दत्तापुर येथील अग्रवाल पेट्रोल पंपजवळ अपघात झाला आहे, तेव्हा मी माझा भाउ विकास मारोतराव भगत, व मीत्र सागर मुरलीधर भाकरे दोन्ही रा . जळगाव आर्वि यांचेसह धामणगाव येथील पेट्रोलपंप जवळ आलो असता आम्हाला दिसले कि गाडी नंबर MH02/CB7907 या फीयाट कंपनीचे कथीया रंगाचे चारचाकी गाडीचा रोडचे बाजुचे निंबाचे झाडाला धडक लागुन अपघात झालेला आहे सदर गाडी डाव्या बाजुने आत चपकलेली दिसुन आली सदर गाडीमध्ये ड्रायव्हर सीटचे डावे बाजुला त्याचा चुलत भाऊ गणेश गजानन शेळके, ड्रायव्हर सीटवर कुश मेश्राम वय 21 वर्ष रा साई नगर परसोडी, तसेच अक्षय राजु टोक वय 19 वर्ष व यश डोळे वय 20 वर्ष रा जे.पी. पार्क धामणगाव रेल्वे हे दोघे मागील सीटवर बसलेले होते त्याच्या भावाचे दोन्ही गुडघ्याला तसेच कमरेला, हनवटीचे खाली मार लागल्याचे दिसुन आले आम्ही लगेच चौघांना ग्रामीण रुग्नालय धामणगाव रेल्वे येथे भरती केले असता डॉक्टरांनी माझा भाऊ गणेश गजानन शेळके यास तपासुन मरण पावल्याचे सांगीतले. व ईतर तिघांना किरकोळ मार लागलेला होता नंतर मला माहीत झाले कि सदरचे वाहन हे कुश मेश्राम हाच चालवित होता. तरी कुश मेश्राम वय 21 वर्ष रा साई नगर परसोडी याने दिनांक 11/01/2025 चे रात्री 12/30 ते 01/00 वा चे दरम्यान त्याचे ताब्यातील फीयाट कंपनीचे कथीया रंगाचे चारचाकी गाडी नंबर MH02/CB7907 ही भरधाववेगाने व निष्काळजीपने चालवुन रोडवरील उजवे बाजुचे नींबाचे झाडाला धडक मारुन माझा चुलत भाऊ गणेश गजानन शेळके याचे मरणास कारणीभुत ठरला तसेच अक्षय राजु टोक, यश डोळे या दोघांना जख्मी करण्यास कारणीभुत ठरला आहे.