जितेंद्र आव्हाड यांचे विरुद्ध कारंजा मद्ये जोडे मारा आंदोलन.. व तहसीलदार यांना निवेदन…
कारंजा (घा): राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे सरकार विरुद्ध केलेल्या आंदोलनात भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून जो अवमान केला त्याविरुद्ध भाजपा कारंजा तालुक्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांचे फोटोला जोडो मारा आंदोलन करण्यात आले.. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व त्यांच्या नेत्यांकडून महामानवाचा अवमान झाल्याने त्यांच्याविरुद्ध निषेधाच्या घोषणा देऊन जितेंद्र आव्हाड यांचे फोटोला जोडे मारण्यात आले..या आंदोलनात
महाराष्ट्र प्रदेश सचिव सरीताताई गाखरे, कारंजा तालुका अध्यक्ष चक्रधरजी डोंगरे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती निताताई गजाम,पंचायत समितीच्या माजी सदस्या आम्रपालीताई बागडे, कारंजा शहराच्या महीला आघाडीच्या अध्यक्षा ज्योतीताई यावले, माजी नगरसेवक संजयजी कदम, कारंजा शहराचे ज्येष्ठ नेते प्रमोदजी चव्हाण, संतोषजी काकडे सर,राजूभाऊ काळपांडे, सुनीलजी वंजारी, कारंजा शहराचे अध्यक्ष दिलीप जसुतकर, प्रकाशजी गाखरे, प्रवीणजी कोवे, विजयजी गाखरे,मनोज भांगे, संजयजी पठाडे, रोशनजी भांगे,पंकज जसुतकर, पवन ढोले, धीरज नासरे, सूरज धोटे उपस्थित होते. यानंतर कारंजा येथील तहसील कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश सचिव सरीताताई गाखरे यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार यांना मुख्यमंत्र्याचे नावे निवेदन देऊन जितेंद्र आव्हाड यांचेविरुद्ध ॲट्रॉसिटी अंतर्गत सक्त कारवाई करण्याची मागणी करण्यात आली..