विठ्ठल मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी उसळली गर्दी,
पोलिसांचा कडक बंदोबस्त…….
अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे
दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त अंजनगाव सुर्जी शहरातील खोडगाव रोडवरील विठ्ठल मंदिर येथे आज गुरुवार दिनांक २९ जुन रोजी सकाळी सहा वाजता पासुन विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली.होती
परंपरेप्रमाणे सकाळी पाच वाजता महाराष्ट्राचे दैवत विठू राया, माता रुक्मिणी ह्यांचे मूर्तीला पंचामृताचा अभिषेक करून पूजा,अर्चा व आरती करण्यात आली
यासाठी मंदीर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.अंजनगाव सुर्जी हे तालुक्याचे पंढरपूर समजले जाणारे विठ्ठल मंदिर येथे आज आषाढी एकादशी निमित्त तालुक्यातील भाविक भक्तांनी पहाटे पासूनच विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सर्व भक्तांना विठ्ठल मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेणे सोपे व्हावे यासाठी परिपूर्ण अशी उपाय योजना करण्यात आली होती, तसेच परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये तसेच अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सकाळ पासून हजारो भक्तांनी विठू रायाच्या दर्शनाचा लाभ घेतला