अमरावती / प्रतिनिधी
: शहरात मोठ्या प्रमाणात सुरु असलेली जनावरांची वाहतूक व गोमांस विक्रीला आळा घालण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकून गौ तस्करांच्या मागे हात धुऊन लागलेल्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचा कार्यकर्ता तथा हिंदू गोरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष अजितपाल मोंगा व त्यांच्या सहकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. रविवारी (ता. २६) पहाटे महामार्गावरील हॉटेल गौरी इन जवळ ही घटना घडली. या जीवघेण्या हल्ल्यात ३ गोसेवक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध सामूहिक हल्ल्याचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. या हल्लेखोरांची स्कॉर्पियो गाडी नागपुरी गेट पोलिसांनी शहरातील रोशननगर येथून जप्त केली आहे..
प्राप्त माहितीनुसार रविवारी सकाळी ६.१५ वाजता ३ वाहनात २०० गायी कोंबून लालखंडी येथे कत्तलीसाठी आणण्यात येत असल्याच्या माहितीवरून गोसेवकांनी सदर तस्करीची वाहने रोखण्यासाठी घटनास्थळ गाठले. एका मांगे एक अश्या ३ वाहनातून गायींना लालखडीकडे. कत्तलीसाठी नेले जात असल्याचे गोरक्षकांनाआढळले. त्यांनी तत्काळ तशी माहिती पोलिसांना दिली. परंतु नेहमीप्रमाणे पोलिसांनी याकडे कानाडोळाच केला. यावेळी शस्त्रसज्ज असलेल्या गो तस्करांनी मात्र गो तस्करीची वाहने रोखण्यास धमकलेल्या गोसेवकांवर धारदार शस्त्रांनी जीवघेणाहल्ला. चढवला. जनावरतस्करीच्या वाहनांसोबतच्या स्कॉर्पियो वाहनातून आलेल्या २० सशस्त्र युवकांनी गोसेवकांवर चाल करून त्यांना मारहाण सुरु केली. यात ३ गौसेवक जखमी झाले.
गोरक्षकांवर जीवघेणा हल्लाची माहिती मिळताच नांदगावपेठ, नागपुरी गेट, वलगाव व गाडगेनगर पोलीस सक्रिय झाले. आरोपींच्या काळ्या रंगाच्या व मागील काचेवर मोठ्या अक्षरात ‘भाई’ लिहलेल्या स्कॉर्पियोचा शोध सुरु झाला. ते वाहन नागपुरी गेट पोलिसांना शहरातील रोशननगर परिसरात बेवारस स्थितीत उभे मिळाले. पोलीस आता या वाहनाच्या मदतीने आरोपींचा शोध घेणार असल्याचे नांदगावपेठ ठाण्याचे प्रभारी ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांनी सांगितले, मागील काही वर्षांपासून अमरावती शहर हे जनावर तस्करीचा हब बनले असून येथून राजरोसपणे व मोठ्या प्रमाणात गौ व गोमांस तस्करी सुरु आहे. जनावरांची तस्करी करणारी डझनभर वाहने दररोज पहाटे आणि रात्री पोलिसांच्या डयुटी बदलण्याच्या वेळेत धावतात. पोलीस प्रशासनाने गो तस्करांना रान मोकळे करून दिल्याचा आरोप यावेळी संतप्त गोसेवकांनी केला.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1