क्राइम

मैत्रिणीने केला घात ; घरी बोलावून अत्याचार 

Spread the love

पुणे  / नवप्रहार डेस्क 

               मैत्रीण म्हणजे अत्यंत जवळची व्यक्ती. जिच्या सोबत मनात चाललेल्या सगळ्य  गोष्टी शेअर करता येतात. त्यामुळे मनात असलेली घालमेल दूर तर होतेच शिवाय अडचणीतुन निघण्याचा मार्ग देखील मिळतो. त्यामुळे मुली कुटुंबातील सदस्यांना आपल्या समस्या सांगण्या पेक्षा त्या मैत्रिणीजवळ मन मोकळे करतात. पण ज्या मंत्रिणीवर कुटुंबापेक्षा जास्त विश्वास टाकल्या जातो त्याच मैत्रिकडून दगाफटका झाला असल्याच्या घटना देखील कधी कधी घडतात.

               मैत्रिणीला घरी बोलावून तिला बिअर पाजून तिच्यावर मित्रांकरवी बलात्कार केल्याची घटना ताजी असतांनाच मैत्रिणीला घरी बोलावून तुला रात्री इथेच थांबावे लागेल अन्यथा तुला मारून टाकू अशी धमकी देत तरुणीवर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची लज्जास्पद घटना उघड झाली आहे.

हा प्रकार आरोपीच्या घरी ३ जानेवारी रोजी घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी मैत्रिणीसह दोघांना अटक केली असून दोघांचा शोध सुरु आहे.

भरत रोहिदास गव्हाणे (वय-२८) आणि सुनोमो भरत गव्हाणे ऊर्फ सुमोना नूर इस्लाम शेख (वय२४, दोघे रा. वडगाव, सिंहगड रोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मैत्रिण हिने फिर्यादी तरुणीला आपल्या घरी बोलावून घेतले. तेथे तिला तिने तुला इथेच या तिघांसोबत थांबाव लागेल, नाही तर आम्ही तुला मारुन टाकू, अशी धमकी दिली. त्यानंतर तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यावेळी तिला आरडाओरडा केला तर मारण्याची धमकी दिली.

घाबरलेल्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकार सांगितला. पोलिसांनी तातडीने तिच्या मैत्रिणीसह दोघांना अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरु आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्रेहल थोरात करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close