सामाजिक

सत्यपाल महाराजांचे शिष्य संदिपपाल महाराज गिते यांचे मासोद येथे समाजप्रबोधनपर कीर्तन 

Spread the love

 

 मासोदमध्ये ‘एक गाव, एक दुर्गा’; शक्तीचा जागर घुमणार!

अंजनगाव बारी : प्रतिनिधी

मासोद येथे ‘एक गाव, एक दुर्गा’ या संकल्पनेतून नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून, मानवता नवदुर्गोत्सव मंडळाच्या वतीने यंदा २६ वर्षांची परंपरा कायम राखण्यात आली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
घटस्थापनेच्या शुभपर्वावर सप्तखंजेरी निर्माते, समाजप्रबोधनकार तथा सत्यपाल महाराजांचे शिष्य संदिपपाल महाराज गिते (रंभापूरकर) यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. हे कीर्तन रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८.३० वाजता मेन चौकातील दुर्गादेवी प्रांगण, मासोद येथे होणार आहे.
कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे. ‘एक गाव, एक दुर्गा’च्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये एकजूट व सामाजिक बांधिलकीचा जागर करण्यात येत आहे.
या समाजप्रबोधनपर कीर्तनाचा व नवरात्रोत्सवातील विविध कार्यक्रमांचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मानवता नवदुर्गोत्सव मंडळ, मासोद यांच्या वतीने करण्यात आले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close