विदेश

धक्कादायक …. 30 वर्षाचा गायक गाता गाताच कोसळला

Spread the love
लाईव्ह। कार्यक्रमा दरम्यान घडली घटना ; जागीच मृत्यू 
 

नवी दिल्ली / नवप्रहार वृत्तसेवा 

 
              सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानवाला स्वतःच्या प्रकृतीमुळे लक्ष द्यायला वेळ नसतो.त्यामुळे तो आपल्या लहान सहान दुखण्या कडे दुर्लक्ष करतो. आणि हीच बाब त्यांच्या अंगावर येते. डॉक्टर नेहमी सांगत असतात की काही काही दुखण्यांकडे मग ते लहानच का असेना दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. ब्राझीलच्या पॉप सिंगर पेड्रो हेन्रीक सोबत असेच घडले आहे. लाईव्ह शो दरम्यान तो स्टेजवरच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला आहे.
ब्राझिलमधील गॉस्पल सिंगर पेड्रो हेन्रिकचा लाइव्ह कॉन्सर्टवेळी मृत्यू झाला. ३० वर्षांचा पेट्रो हेनरिक ब्राझीलमधील एका इव्हेंटमध्ये परफॉर्मन्स सादर करत होता पेड्रोची प्रकृतीही त्यावेळी ठीक दिसत होती. मात्र गाणं गात असताना त्याने माईक वर केला आणि अचानक खाली कोसळला. त्याची पूर्ण हालचालच बंद झाली होती. पेड्रोचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गायक केके यांचं ३१ मे २०२२ रोजी वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झालं होतं. कोलकात्यात लाइव्ह कॉन्सर्टवेळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. तेव्हा रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण उपचाराआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
रिपोर्टनुसार, स्टेजवर परफॉर्मन्स सुरू करण्याआधी पेड्रोने आपल्या मित्राला बरं वाटत नसल्याचं सांगितलं होतं. तो खूप थकलेला होता. रेकॉर्ड लेबल तोडाह म्युजिकनेसुद्धा हेनरिकच्या मृत्यूनंतर निवेदन जारी केलंय. पेड्रोला मोठा हार्ट अटॅक आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. तो एक आनंदी व्यक्ती होता असंही लेबलने म्हटलं.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close