सामाजिक

घाटंजी शहरातील पूरग्रस्तांसाठी ‘एक हात मदतीचा

Spread the love

गरजूंच्या मदती साठी स्वयंमसेवी संस्था, दान दात्यांचा पुढाकार.

घाटंजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार

घाटंजी -गेल्या दोन दिवसात झालेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात मोठे नुकसान झाले. यातच घाटंजी शहरातील वाघाडी नदी काठावरी वास्तव्यास राहणाऱ्या गरीब कुटुंबाचे मोठे नुकसान झाले.वाघाडी नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका बसला .या पुरामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झालेली आहे.घरात ४-५ फूट एवढं पाणी घुसल्याने घरातील अन्नधान्य संपूर्ण खराब झाले.घरातील कपडे,चादरी, ब्ल्यांकेट पाण्यात चिखलात खराब झाले.घरातील कागदपत्रासहित वस्तू वाहून गेल्या.इलेक्ट्रिक उपकरणे पाण्यात डुबल्याने खराब झाले. या गरीब कुटुंबांना मोठं नुकसान झाल्यामुळे. घाटंजीतील स्वयंसेवी संस्था, संघटना आणि समजसेवकांनी किराणा कीट, ब्लॅंकेट,चादर इत्यादी वस्तूंचे वाटप केले.प्रत्येकाच्या घरी जावून भेट देण्यात आली.त्यांच्या घराची पडझड पाहून ही गरीब मंडळी हा संसार पुन्हा कसा उभा करतील हा प्रश्नच पडला.मात्र आपण त्यांच्या या मोडलेल्या संसाराला हातभार लावावा यासाठी एक हात मदतीचा हा उपक्रम राबविण्यात आला. यामधे गोलू फूसे,राम अग्रवाल,होमदेव किनाके, गणेश उन्नरकर,संगीताताई भुरे,विभा केशट्टीवार,पुष्पा नामपल्लीवार, ईश्वर द्रोणा सर, आनंदराव मडावी, महेश पवार इत्यादी व्यक्ती आणि संस्था म्हणून नियती बहुद्देशीय संस्था घाटंजी, यशस्विनी महिला बहुउद्देशीय संस्था घाटंजी,ओबीसी महिला संघटना घाटंजी,अध्यक्ष आदिवासी जेष्ठ नागरिक संघटना तालुका घाटंजी, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था,शाखा घाटंजी, रसिकाश्रय संस्था घाटंजी यांचा समावेश होता. तसेच महिला मंडळाच्या भगिनी साधना ठाकरे, कविता इंगोले,अश्विनी भुरे, अमृता गवळी,मंजुषा भोयर, ज्योती वाढोणकर,सुषमा चौधरी, रुचीता ठाकरे,वृषाली बेले, भाग्यश्री बिबेकार,जया तुरक, भाग्यश्री कोमावार,रोशनी झाडे यांचे सहकार्य मिळाले.
विशेष म्हणजे पांढरकवडा येथील सर्वम रजनीकांत बोरेले या एक वर्षाच्या मुलाचे खाऊचे पैसे या किराणा कीट मध्ये टाकण्यात आले. यासाठी टीम तर्फे सर्वम चे अभिनंदन करण्यात आले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close