क्राइम

शॉर्टकट पडले महागात महिलेने गमावली अब्रू 

Spread the love

छत्रपती संभाजी नगर / क्राईम रिपोर्टर

पतीशी वाद झाल्यानंतर घरातून बाहेर पडणे एका महिलेच्या चांगलेच अंगलट आले आहे. शॉर्टकट ने घरी पोहचवून देण्याच्या नावावर ऑटो चालकाने तिच्यावर अत्याचार केला आहे. तो तिचे सोन्याचे दागिने हिसकावणार हे पाहून प्रसंगावधान राखत तिने पळ काढला.आणि एका चहा टपरी वाल्याला मदत मागितली.

महिलेला सुरक्षित घरी पोहोचवण्याचे आश्वासन देऊन ऑटोरिक्षात बसवणाऱ्या चालकानेच तिला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरच्या जांबरगावपरिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नेमकी कशी घडली घटना?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित ३० वर्षीय महिला ही पती आणि दोन मुलांसह छत्रपती संभाजीनगर शहरात राहते. सोमवारी संध्याकाळी घरगुती कारणावरून तिचा पतीसोबत वाद झाला होता. त्यामुळे ती अतिशय चिडून आणि रागाच्या भरात घर सोडून बाहेर पडली. एका ऑटोरिक्षाने ती कायगाव येथे पोहोचली आणि तिथे असलेल्या रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ बराच वेळ बसून राहिली.

रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास एक तीन आसनी ऑटोरिक्षाचालक तिच्याजवळ आला. एक महिला एवढ्या रात्री एकटीच बसलेली पाहून त्याने तिच्याकडे चौकशी केली. महिलेने त्याला जोगेश्वरीजवळील रांजणगाव येथे सोडण्यास सांगितले. रिक्षाचालकाने तिला सुरक्षित घरी पोहोचवण्याचे आश्वासन दिले आणि तिला रिक्षात बसवून घेतले.

‘शॉर्टकट’चे कारण अन् निर्जन स्थळी अत्याचार

रिक्षात बसवल्यानंतर चालकाने रांजणगावच्या मार्गाने न जाता रिक्षा दुसऱ्याच मार्गाला वळवली. गंगापूर परिसरात पोहोचल्यानंतर महिलेच्या हे लक्षात आले आणि तिने चालकाला विचारणा केली. मात्र, चालकाने “हा रस्ता शॉर्टकट आहे, मी तुम्हाला व्यवस्थित घरी सोडतो,” असे सांगून तिला जाळ्यात ठेवले. काही तासांचा प्रवास केल्यानंतर मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चालकाने ऑटोरिक्षा जांबरगाव परिसरातील एका अंधाऱ्या व निर्जन ठिकाणी थांबवली. त्यानंतर त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. एवढ्यावरच न थांबता त्याने तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून मागितले आणि तिच्या गळ्यावर हात ठेवला.

धैर्याने पळ काढला, चहाच्या टपरीवर मागितली मदत

जीवावर बेतलेल्या या प्रसंगात पीडित महिलेने अत्यंत धैर्याने चालकाचा हात हिसकावून तिथून पळ काढला. ती धावत मुख्य रस्त्यावर पोहोचली आणि तेथील एका चहाच्या टपरीवर गेली. टपरीचालकाला सर्व प्रकार सांगून तिने तात्काळ पोलिसांना फोन करण्यास सांगितले. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पीडित महिलेला पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली व तिच्या तक्रारीवरून अज्ञात ऑटोरिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस संबंधित मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने रिक्षाचालकाची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close