सामाजिक

अंकुर साहित्य संघाकडून देवकामाई यांचा सत्कार

Spread the love

 

अकोला / प्रतिनिधी

प्रसिद्ध गझलकार देवकामाई देशमुख यांच्या कवितेचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला याबद्दल अंकुर साहित्य संघाकडून घरी जाऊन सत्कार करण्यात आला
साहित्य, समाजकार्य आणि गझललेखनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रसिद्ध कवयित्री व गझलकार देवकामाई जगनाथराव देशमुख यांच्या “थिगंय” या कवितेचा विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल अंकुर साहित्य संघ, अकोला जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी ताईंना पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. अंकुर साहित्य संघाचे अकोला जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख तसेच सचिव श्री धीरज चावरे सर उद्योजक तथा साहित्यिक श्री सुनील लव्हाळे व त्यांची कन्या स्वरा सुनील लव्हाळे तसेच पत्रकार संदीप दादा देशमुख या उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या साहित्यिक कार्याचे कौतुक करत अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात कवितेचा समावेश होणे ही त्यांच्या दीर्घकालीन साहित्यसेवेची मोठी दखल असल्याचे मत व्यक्त केले.
देवकामाई देशमुख या संवेदनशील लेखनशैली, सामाजिक जाणीव आणि स्त्रीमनाच्या प्रभावी अभिव्यक्तीसाठी ओळखल्या जातात. त्यांचे “महामानवीची जीवनगाथा”, “अलख” आणि “हाय” हे कवितासंग्रह प्रसिद्ध असून त्यांच्या कविता अनेक वृत्तपत्रे, मासिके व दिवाळी अंकांत प्रकाशित झाल्या आहेत. “ राजधुळ” मासिकाच्या संपादक म्हणून त्यांनी कार्य केले असून विविध साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजनही केले आहे.
“थिगंय” या कवितेतून संसारातील संघर्ष, तुटलेपण आणि त्यामधील आत्मसन्मान यांचे प्रभावी चित्रण केले आहे. विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांची जाणीव करून देणारी ही कविता अभ्यासक्रमात समाविष्ट होणे हा त्यांच्या साहित्यिक कार्याचा सन्मान मानला जात आहे.
त्यांच्या या यशाबद्दल साहित्यप्रेमी, शिक्षक व वाचकवर्गातून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील साहित्यप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close