विदेश

 थरारक… पाहता पाहता मगरी ने ट्रेनर महिलेचा हात जबड्यात धरून पाण्यात खेचले 

Spread the love

          जंगली प्राणी मग ते जलचर असो की थलचर अथवा उभयचर ते कधीना कधी आपला स्वभाव दाखवून देतात.अनेक वेळा अश्याया प्राण्यां द्वारे त्यांच्या ट्रेनर वर किंवा अन्य व्यक्तीवर हंल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या मगरी ने आपल्या ट्रेनर वर हल्ला करून तिचा हात आपल्या जबड्यात पकडून पाण्यात ओढले आणि तिला गरा गरा फिरवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ पाहूनचं तुमच्या अंगावर काटा येईल. एका प्राणी संग्रहालयात एक महिला झू ट्रेनर मगरीजवळ उभी असताना मगर तिच्या हातावर हल्ला करते, यानंतर महिलेबरोबर मगर पुढे असे काही करेते जे पाहून तुमच्याही ह्रदयाचा ठोका चुकेल.

मगरी आपल्या जबड्यात तिचा हात इतका मजबूतीने पकडते की महिलेला तो सोडवणे कठीण होते, यानंतर एक व्यक्ती तिथे धावत येतो आणि मोठ्या मेहनतीने महिलेचे प्राण वाचवतो. यावेळी झूमध्ये उपस्थित लोक, लहान मुलं हे थरारक दृश्य पाहून घाबरतात.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, प्राणीसंग्रहालयातील एका पाण्याच्या मोठ्या बॉक्समध्ये एक मगर पोहत असते. यावेळी पोहत ती जवळच उभ्या असलेल्या महिलेच्या दिशेने जाते आणि तिच्या हातावर झडप घालते. यानंतर महिलेचा हात ती आपल्या जबड्यात घट्ट पकडते आणि तिला ओढत पाण्यात खेचते. महिला तिच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करते पण मगर शेवटपर्यंत तिचा हात सोडत नाही, उलट हात सोडण्याचा प्रयत्न करत असतानाच मगर तिला दोन तीनवेळा पाण्यात गरगर फिरवते. यावेळी एक व्यक्ती तिथे येतो आणि मगरीच्या पाठीवर बसून तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करतो. अखेर काही मिनिटांनी मगरीच्या तावडीतून महिलेची सुटका होते, यावेळी मगर पाठीवर बसलेल्या व्यक्तीला खाली उतरवण्याचा खूप प्रयत्न करते पण तो व्यक्ती उठत नाही, शेवटी संधी मिळताच सुखरुपपणे तो व्यक्तीही मगरीच्या पाठीवरुन उठून बाहेर पळतो.

मगरीच्या हल्ल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ @PicturesFoIder नावाच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो आत्तपर्यंत अनेकांनी पाहिला असून लोक त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स देत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close