राजकिय

भाजप ओ बी सी मोर्चा चा पदग्रहण सोहळा संपन्न

Spread the love

 

 

अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे 

 

येथील गुलजार पुरा भागातील पटेल मंगल कार्यालयात भाजपा ओबीसी मोर्चा, भाजपा ओबीसी महीला मोर्चा शहर व ग्रामीण यांचा भव्य पदग्रहण सोहळा पार पडला या कार्यक्रमात उपाध्यक्ष,सरचिटणीस,सचिव,कोषाध्यक्ष,सोशल मीडिया प्रमुख व प्रसिद्धी प्रमुख या पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले 

******** कार्यक्रमाला भाजप ओ बी सी मोर्चा चे जिल्हाअध्यक्ष (ग्रामीण) ॲड. पदमाकर सांगोळे , भाजपा विधानसभा प्रमुख गोपाल चंदन, माजी आमदार रमेश बुंदीले, भाजपा सरचिटणीस, डॉ. विलास कविटकर, माजी नगराध्यक्ष ॲड. कमलकांत लाडोळे, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संतोष काळे, विधानसभा प्रमुख, श्रीकृष्ण सावरकर, भाजप शहरअध्यक्ष उमेश भोंडे, तालुका अध्यक्ष भाजपा रविकुमार गोळे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनोहर मुरकुटे, किरण गिऱ्हे, जिल्हा जनसंपर्क संयोजक मनीष मेन, विस्तारक सबुलाल दहिकर, जिल्हा जनसंपर्क सहसंयोजक रेखा रेखाते, युवा मोर्चा शहरअध्यक्ष गौरव चांदूरकर, युवा मोर्चा सरचिटणीस, श्याम गुजर, व शहरअध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा, रितेश आवंडकर , शहरअध्यक्षा भाजपा ओबीसी महिला मोर्चा शितल बलंगे व तालुकाअध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा, क्षितिज रोहनकर यांनी आपली कार्यकारणी जाहीर केली व विविध पदांवर नियुक्त्या झालेल्या पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले कार्यक्रमाचे संचालन भाजपा महिला मोर्चा च्या तालुकाध्यक्ष निता बोचरे यांनी तर आभार प्रदर्शन ओ बी सी महिला मोर्चा च्या शहर अध्यक्ष शीतल बलंगे यांनी केले

पदग्रहण सोहळ्यात कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close