क्राइम

लज्जास्पद … उत्तेजक गोळ्या घेऊन अपंग महिलेवर घरात घुसून बलात्कार

Spread the love

दौसा / नवप्रहार डेस्क 

                    दौसा ठाण्याच्या हद्दीतील एका गावात तरुणाने उत्तेजक गोळ्या खाऊन घरात झोपल्या असलेल्या  अपंग महिलेवर  बलात्कार केल्याचा लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. महिलेने बोंबलू नये म्हणून या नाराधमाणे तिच्या तोंडात कापडाचा बोळा घातला होता. महिलेने कसाबसा तोंडातून बोळा काढून आरडाओरड केल्याने कुतुकबियांनी तरुणाला पकडून पोलिसांच्या हवाली केले. 

हे प्रकरण दौसातील राहुवास पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे एक 40 वर्षीय अपंग महिला आपल्या घरात झोपली होती. ती दोन मुलांची आई देखील आहे आणि मुले तिच्यादूर झोपली होती. शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास बाबूलाल मीना नावाचा तरुण तिच्या खोलीत गुपचूप घुसला आणि तिच्या तोंडात कपडा भरला. यानंतर तो तिच्याशी गैरवर्तन करत राहिला. महिलेने कसेतरी तोंडातून कापड काढून आरडाओरडा केल्यावर घरातील सर्वजण तिच्या खोलीकडे धावले.

आरोपींला रात्रभर बांधून ठेवले

आरडाओरडा केल्यानंतर आरोपी घरातून पळू लागला, मात्र कुटुंबीयांनी इतर ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पकडले. संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी आरोपी तरुणाला अर्धनग्न करून रात्रभर घराच्या खांबाला बांधून ठेवले आणि डोक्याचे केस कापले. शनिवारी सकाळी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी तरुणाची सुटका करून त्याला ताब्यात घेतले. पीडित तरुणीने आरोपी तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, त्यावरून पोलिसांनी वैद्यकीय तपासणी आणि इतर कारवाई सुरू केली आहे.

उत्तेजक गोळ्या घेऊन आरोपी आला होता

पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाच्या खिशात उत्तेजक गोळ्याही सापडल्या आहेत. हिरालालचा मुलगा बाबूलाल मीना याने गोळी खाऊन बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. राहुवास पोलीस ठाण्याचे अधिकारी रघुवीर सिंग या प्रकरणाचा तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close