क्राइम

दरोड्याचा  बनाव ; पतीच निघाला बायकोचा खुनी 

Spread the love

बुलढाणा / नवप्रहार डेस्क 

                 पशुवैद्यकीय डॉक्टर च्या घरी सशस्त्र दरोडा पडला आणि दरोडेखोरांनी डॉक्टर पत्नीला मारून टाकले पती जखमी अशी या दरोड्याची स्टोरी होती. पण हा दरोडा नव्हे तर डॉक्टर पती ने रचलेला कट होता हे पोलीस तपासात सिद्ध झाले आहे.

अनैतिक संबंधापायी डॉक्टर असलेल्या नराधम पतीने अगोदर पत्नीची हत्या केली, नंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी घरात दरोड्याचा ‘देखावा’ तयार केला आणि स्वतःही गुंगीच्या गोळ्या घेत जखमी झाल्याचं सोंग वठविले..

यापूर्वी डॉक्टरच्या मोबाईलमधील नको ते क्लीपिंग, व्हिडीओमधून सर्व प्रकार उघडकीस आला होता. काल बुधवारी रात्री उशिरा बोराखेडी पोलिसांनी आरोपी डॉ. गजानन टेकाडे (४५) याला ठाण्यात आणले. त्याला पोलिसी हिसका दाखविताच डॉक्टर पोपटासारखा बोलायला लागला. गजानन याने आपणच बायको (माधुरी टेकाडे) हिची अगोदर भरपूर झोपेच्या गोळ्या औषधीतून पाजून नंतर तिची उशीने नाक तोंड दाबून हत्या केल्याचे या पांढरपेक्षा आरोपीने कबूल केले. पत्नीच्या जवळच्या नातेवाईक असलेल्या युवतीसोबत अनेक वर्षांपासून असलेल्या अनैतिक संबंधातून आपण हे कृत्य केल्याचे टेकाडे याने सांगितले. यानंतर त्याने बोराखेडी पोलिसांना आपण केलेल्या खऱ्याखुऱ्या हत्येची आणि बनावट दरोड्याची हकीकत तपशीलवार पणे सांगितली. प्रकरणी आरोपी विरुद्ध हत्या करण्याच्या कारणसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे मोताळा तालुक्यात नव्याने खळबळ उडाली. बोराखेडी पोलिसांनी आरोपी डॉक्टर गजानन टेकाडे याला अटक केली आहे.

काल बुधवारी रुग्णालयातून सुट्टी होताच रात्री बोराखेडी पोलिसांनी डॉक्टरला ताब्यात घेत बोरखेडी पोलीस ठाण्यात आणले. त्याला ‘बाजीराव दाखविताच’ टेकाडे याने भडाभडा आपल्या पापाचा घडा वाचला. २९ जानेवारीला डॉ. गजानन टेकाडे याचे घरात दरोडा पडल्याचे वरकरणी दिसून आले. मात्र ते सुनियोजित हत्याकांड असल्याचे सिद्ध झाले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close