विदेश

तीन महिन्याच्या बाळाच्या साह्याने कार वरील बर्फ साफ करणाऱ्या बापा विरोधात युजर्स आक्रमक 

Spread the love

अमेरिका / नवप्रहार ब्युरो

अमेरिकेत प्रचंड बर्फ पडत आहे. त्यामुळे घराबाहेर पडणे कठिण होऊन बसले आहे. पण या जीवघेण्या स्थितीत एका बापाच्या कृत्याने सोशल मीडियावरील युजर्स ला हैराण केले आहे. हा बाप आपल्या तीन महिन्यांच्या बाळाला कार च्या बोनेट आणि अन्य ठिकाणी जमलेल्या बर्फावरून त्याचे जॅकेट धरून फिरवताना दिसत आहे. यावेळी तो हसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी या बापाला ‘ निर्दयी  बाप ‘ असे नाव दिले आहे.

दरम्यान, या निर्दयी बापाला आता अटक करून, त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. अमेरिकेच्या टेक्सासमधील पोर्ट आर्थर भागातील एका बापानं कडाक्याच्या बर्फवृष्टीत कारवरील बर्फ साफ करण्यासाठी चक्क पोटच्या तीन महिन्यांचा बाळाचा वापर केला आहे,

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, काळ्या रंगाचं जॅकेट घातलेलं एक बाळ आहे. तर त्याच्या बापानं शॉर्ट-स्लीव्ह शर्ट आणि पँट परिधान केली आहे. या तीन महिन्यांच्या बाळाला त्या बापानं ह्युंदाई एलांट्रा कारच्या विंडशील्डवर ठेवलं आहे आणि हसत हसत तो बाप कारवर ज्याप्रमाणे फडका फिरवतात अगदी त्याचप्रमाणे बर्फ साफ करण्यासाठी बाळाचा वापर करीत आहे. तो बाळाच्या जॅकेटला धरून कारवरील बर्फ साफ करतोय. त्यासाठी तो बाळाला अक्षरश: कारवर रगडतोय. इतक्या कडाक्याच्या थंडीत चिमुकल्या बाळाबरोबर असं निर्दयी कृत्य तो बाप करु शकतो, असा सवाल आता उपस्थित होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे कृत्य करताना तो चक्क हसताना दिसतोय.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोर्ट आर्थर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात अटक वॉरंट जारी करीत कारवाई केली जाईल, असे सांगितले. तसेच जेव्हा व्हिडीओ शूट केला जात होता तेव्हा त्या व्यक्तीबरोबर दोन महिला होत्या आणि त्यातील एक महिला बाळाची आई होती, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे या घटनेतील जे दोषी असतील त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. पण अशाप्रकारे टिकटॉक व्हिडीओसाठी बाळाबरोबर कडाक्याच्या थंडीत अशाप्रकारचे कृत्य करणं तुम्हाला योग्य वाटलं का? आम्हाला कमेंट करुन सांगा.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close