कॉलेज तरुणीची गळा चिरुन हत्या ; तरुणी एम एसस्सी ची विद्यार्थिनी
तरुणाचे आत्मसपर्पण
तरुणा ने विद्यार्थिनीला बोलवुन तिची गळा चिरून हत्या केल्याची घटना उजेडात आली आहे. त्यांनतर आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. शिफा असे मय्यत मुलीचे नाव आहे तर मुबिन असे मारेकरी तरुणाचे नाव आहे.
शिफा अब्दुल वाहिद (वय २४) ही सिंधनूर च्या शासकीय महाविद्यालयात एम एसस्सी चे शिक्षण घेत होती. आरोपी मुबीनने शिफा हिला काल सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तिला फोन केला. यावेळी विद्यार्थिनी महाविद्यालयामध्ये न जाता मुबीनशी बोलत होती.
दोघांमध्ये वादावादी झाली आणि मुबीनने चाकू काढून शिफाचा गळा चिरून पळ काढला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने शिफाचा मृत्यू झाला. पोलिस उपाधिक्षक बी. एस. तलवार, ग्रामीण ठाणे मंडळ पोलिस निरीक्षक वीररेड्डी, बालागनूर निरीक्षक यारीप्पा यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. खून केल्यानंतर आरोपी मुबीनने लिंगसुगुरू पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.