दारू तस्करी साठी युवकांचा तो ‘ जुगाड ‘ पाहून पोलिसही चक्रावले
पेट्रोल टॅंक मध्ये दारूच्या बाटल्या ठेवून करत होते तस्करी
चंद्रपूर / नवप्रहार मीडिया
भारतातील लोकं केव्हा काय करतील याचा नेम नसतो. एखाद्या गोष्टीत नवीन काही तरी करून ते असा काही ‘ जुगाड ‘ करतात कि या जुगडाची चर्चा होते. आता हेच पहा ना ! गडचिरोली येथील युवकांनी दारू तस्करी साठी अशी काही शक्कल लढवली की पोलिसांनी त्यांना पकडल्यावर त्यांची दुचाकी दारू वर चालते की पेट्रोल वर असा प्रश्न त्यांना पडला. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की नेमकं प्रकरण काय ? तर आपली उत्कंठा जास्त न ताणता आपणाला या बद्दल अवगत करत आहोत. पण सध्या या अजब दारु तस्करीची चंद्रपुरमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी आहे. दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारूची छुप्या मार्गाने वाहतूक करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढविल्या जातात. अशाच दोन बहाद्दर युवकांनी बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये पेट्रोल ऐवजी चक्क दारूच्या बाटल्या लपवल्याचे आढळले आहे. दोन आरोपी चामोर्शी येथे मोटरसायकलने दारूची वाहतूक करत होते. याची कुणकुण लागताच पोलिसांनी चामोर्शीतील जुन्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहाजवळ सापळा लावून त्या दोघांना ताब्यात घेतले.
बाईकच्या पेट्रोल टँकमधून एकामागोमाग एक दारूच्या बाटल्या निघतच असल्याने टँकमध्ये पेट्रोल आहे की नाही, आणि नसेल तर गाडी चालत कशी होती, असा प्रश्न पोलिसांना पडला होता. पेट्रोल टँक गाडीच्या सीटखाली बनवण्यात आल्याचे दिसून आले. पेट्रोल पुरवठ्याचा पाईप तेथून इंजिनला जोडलेला होता. दारूची वाहतूक करण्यासाठी या बहाद्दरांनी लढविलेली ही शक्कल पाहून चामोर्शी ठाण्याचे पोलिसही चक्रावून गेले. बाईक आणि दारूच्या बाटल्या जप्त करून दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर आणि वर्धा या दारुबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये दारु पोहोचवण्यासाठी तस्करांकडून वेगवेगळे मार्ग शोधले जातायत. 407 मेटॅडोरमध्ये खाली स्लायडिंग प्लेट लाऊन त्यात दारू लपवून चंद्रपूर मध्ये तस्करीचा भंडाफोड यवतमाळ पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं केला. गोपनीय माहितीवरुन पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता वरवर काहीही दिसत नसलं तरी ट्रॉलीखाली एक स्लायडिंग प्लेट निदर्शनास आली. ही प्लेट सरकवली असता आत दारूचे बॉक्स आढळले.
चंद्रपूर शहरात रुग्णवाहिकेतून दारूची तस्करी होत असल्याचं उघडकीस आले होते. शहरातील बाबूपेठ भागात रामनगर पोलिसांनी कारवाई करत अवैध दारु जप्त केली होती. यवतमाळहुन चंद्रपुरात ही दारु आणली जात होती, जवळपास 6 लाखाच्या दारुसह 16 लाख 85 हजारांचा मुद्देमाल य़ावेळी जप्त करण्यात आला. याप्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या राहुल वानखेडे याला अटक करण्यात आली.