१७ वर्षीय अल्पवयीन मुलिवर अत्याचार

अॅटो चालक आरोपी पोलिसांच्या ताब्यात
घाटंजी तालुका प्रतिनिधी- सचिन कर्णेवार
घाटंजी :-तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर बळजबरी करुन अत्याचार करण्यात आल्याची घटना दि. २९ जानेवारी रोजी उघडकीस आली. घाटंजी पोलीसांनी दिलेल्या माहितीवरून शहरातील एका विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला.या घटनेतील आरोपीचे नाव करण पाडुरंग सोनुले वय २५ वर्ष (अंदाजे) रा. मानोली असे आहे.आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून अटक कऱण्यात आली आहे.आरोपी हा ऑटोचालक असुन ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला त्याने आपल्या प्रेम प्रकरणात अडकून पिडितेसोबत बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली दि.२२ जानेवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान पीडितेच्या घरी कोणीही हजर नसतांना आरोपीने या संधीचा फायदा घेत पिडीतेसोबत बळजबरीने शारीरीक सुखाची मागणी करत जबरीने अत्याचार केला.या घटनेची वाच्यता कुठे केल्यास, माहीती दिल्यास जिवाने मारण्याची धमकी दिली. तेव्हा पिडीतेने भितीपोटी कोणालाही सांगीतले नाही.परंतु आरोपी हा नेहमी पिडीतेचा पाठलाग करुन वारंवार शारिरीक सुखाची मागणी करत असल्याने त्याच्या जाचाला कंटाळुन सर्व घडलेला प्रकार पिडीतेने कुटुंबाला सांगीतला.तेव्हा पिडीतेच्या आईवडीलांनी घाटंजी पोलीस स्टेशन गाठून या घटनेची तक्रार दिली.यावरून पोलीसांनी आरोपी विरोधात विवीध कलमान्वे गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
सदर गंभीर घटनेचा तपास घाटंजी पोलिस स्टेशन चे निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक राजेश पंडित, शेख आसिफ करीत आहेत.या घटने ने मात्र अल्पवयीन मुलीला फुल लावणे,बळजबरितून शारिरिक सुखाची मागणि करणा-याचे प्रमाण वाढीस लागल्याचे निक्षपण होत शाळेत शिकणा-या अल्पवयीन मुलिंच्या पालक वर्गात चिंता निर्माण झाली आहे.
0000000000000000000000