क्राइम
बाईक स्टंटबाजांकडून एसटी चालकाचा गळा दाबून धमकी
वरुड / प्रतिनिधी
: एस. टी. बससमोर आडवीतिडवी मोटारसायकल चालवित असल्याने याबाबत चालकाने हटकले असता त्यांची कॉलर पकडून गळा दाबला व चाकू मारण्याची धमकी दिली. येथील एस.टी. बस स्थानकासमोर हा प्रकार गुरूवारी सायंकाळी घडला. गुरूवारी सायंकाळी बस चालक गणेश देवराव खेरडे हे बस घेवून जात असताना सै. फरदीन सै. अनिस रा. नया डायसा व मयूर नामक युवक बससमोर मोटारसायकल स्टंन्टबाजी करीत होते. यावेळी चालकाने त्यांना
हटकले असता मोटारसायकल बससमोर आडवी करून चालकाची कॉलर पकडून गळा दाबला व चाकूचा धाक दाखविला. अशा आशयाची तक्रार चालक गणेश खेरडे यांनी वरूड पोलीस ठाण्यात केली. त्या आधारे सदर स्टंन्टबाजाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास वरूड पोलीस करीत आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1