दिशा कॉम्प्युटरच्यावतीने 9 ते 18 जानेवारी दरम्यान कॉम्प्युटर कोर्सला मोठी सवलत
कॉम्पुटर कोर्स उज्वल भविष्यासाठी अतिशय गरजेचे -आ. संग्राम जगताप
नगर – आज कॉम्प्युटर शिक्षण हे साक्षरतेचे लक्षण झाले आहे, त्यामुळे प्रत्येकाला कॉम्प्युटर येणे हे क्रमप्राप्त आहे. आज शालेय विद्यार्थ्यांपासून कॉलेजपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कॉम्पयुटर कोर्स हे अनिर्वाय झाले आहे. नियमित अभ्यासबरोबर कॉम्प्युटर कोर्स केल्यास नोकरीची चांगल्या संधी मिळत असते. दिशा कॉम्प्युटरने राज्यात विविध शाखांच्या माध्यमातून हजारोंना विद्यार्थ्यांना विविध कोर्सच्या माध्यमातून सक्षम करण्याचे काम करत आहे. सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना अल्पदरात कोर्स उपलब्ध व्हावे, यासाठी दिशा कॉम्प्युटरने चांगली संधी उपलब्ध करुन दिली आहे. या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवश्यक ते ज्ञान मिळून त्यांना भविष्यात योग्य दिशा मिळेल तसेच विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्यासाठी देखील गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
अहिल्यानगर दिल्लगेट, पाईपलाईन व माळीवाडा येथील दिशा कॉम्प्युटरच्यावतीने मोठी सवलत कोर्सच्या पोस्टरचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यात कोणताही कोर्स फक्त १४५०/- मध्ये देण्यात आला आहे. याप्रसंगी संचालक शाम मुळे, उमेश कुलाळ, सूरज केळकर, महेश सुरसे,विकास जाधव,विनायक नेवसे, शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रास्तविकात शाम मुळे म्हणाले, दिशा कॉम्प्युटरच्या माध्यमातून गेल्या 16 वर्षांपासून विविध कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान देऊन त्यांना सक्षम करण्याचे काम करण्यात येत आहे. प्रत्येक क्षेत्रातील नवनवीन बदलांचा स्विकार करुन त्यापद्धतीचे शिक्षण दिशा कॉम्प्यूटर मधून दिले जात असल्याने विद्यार्थी परिपूर्ण होऊनच बाहेर पडतो. आज सवलतीच्या दरात अनेक कोर्स उपलब्ध करुन देत मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. दिशा कॉम्प्युटरच्या दिल्ली गेट, पाईपलाइन व माळीवाडा शाखेत 9 ते 18 जानेवारी या कालावधीत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांसाठी विविध कोर्स फक्त १४५०/- मध्ये देण्यात येणार आहे. या संधीचा फायदा घेऊन आपल्या आवडता कोर्स करुन आपले करिअर घडवावे, असे आवाहन शाम मुळे यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते दिशा कॉम्प्युटर दिल्ली गेट शाखा मोठी सवलत पोस्टरचे अनावरण करताना संचालक शाम मुळे,उमेश कुलाळे,विशाल दहातोंडे,कैलास केळकर आदी. (छाया : यतीन कांबळे)