सामाजिक

भरधाव कारची विजेच्या खांबाला धडक

Spread the love

कार चालकाचा नागपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू.

वरूड/तूषार अकर्ते

बेनोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नागझीरी फाट्या जवळ भरधाव स्विफ्ट कार क्रमांक एमएच २७ ए वाय ०१४५ ने रस्त्याच्या कडेला असणा-या विजेच्या खांबाला धडक देऊन वाहन पलटी झाले होते. या अपघातात वाजिद शाह खालिद शहा (२१) रा.यास्मिन नगर अमरावती याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जखमी वाजीद ला प्रथमउपचारासाठी ग्रामीन रूग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथून नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. सदर जखमी वर नागपूर येथे उपचार सुरू असताना त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. फिर्यादी खालिद शाहा अमानुलाहक शहा यांच्या तक्रारीवरून तसेच नागपूर अजिनी पोलीसच्या डायरीवरून बेनोडा पोलिसात कलम २७९, ३०४ (अ) भादंवि नुसार दि.२८ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बेनोडा पोलीस करीत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close