राजकिय

कायम जनतेच्या सेवेत समर्पित राहून काम करणारे नेतृत्व म्हनजे आमदार सावरकर

Spread the love

बाळासाहेब नेरकर कडून

न्यू तापडिया नगर येथील रेल्वे क्रॉसिंग वरील उड्डाणपुलाच्या कामा करता रेल्वे गेट 38A हे 6 डिसेंबर पासून बंद असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने व रेल्वे क्रॉसिंग वरील पूलाच्या जोडणीचे काम सुरू असल्याने हे रेल्वे गेट संपूर्णतः वापरासाठी बंद केले आहे परंतु नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता टू व्हीलर व पाई चालणाऱ्या नागरिकांकरता पर्यायी मार्ग त्याच ठिकाणाहून देण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी सूचना दिल्या.

मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कायम कार्यरत असणारे आमदार नागरिकांना होणाऱ्या त्रासाला देखील तेवढ्याच पोट तिडकीने मार्ग काढून निकाली लावतात त्यामुळेच रणधीर भाऊन बद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात विश्वास आहे.

यावेळी महानगर अध्यक्ष जयंतराव मसने नगरसेवक हरीश काळे,सागर शेगोकार,पूर्व मंडळ अध्यक्ष संदीप गावंडे,उमेश श्रीवास्तव,विवेक भरणे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्याबाबत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या व नागरिकांच्या समस्या निकाली काढण्यास त्वरित कार्यवाही करण्याच्या आदेश दिले

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close