सेक्स टॉय, व्याग्रा, सह मादक इंजेक्शन हस्तगत
छत्तीसगड / नवप्रहार ब्युरो
अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या छत्तीसगड जिह्यातील डोंगरगड येथे प्रज्ञागिरी पहाडावर असलेल्या एका कथित आश्रमात पोलिसांनी छापा टाकत बाबांच्या डर्टी गेम चा पर्दाफाश केला आहे. कांतिलाल अग्रवाल असे त्या बाबाचे नाव असून तो विदेशी लोकांना योग शिकविण्याच्या नावावर अशोभनीय कार्य करीत असल्याचे समजत आहे.
छाप्यात आपत्तीजनक साहित्य हस्तगत – या आश्रमाला घेऊन पोलिसांना अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. बुधवारी एसडीपीओ आशिष कुंजाम च्या नेतृत्वात करण्यात आलेल्या छापेमारीत २ किलो गांजा, सेक्स टॉय, नशेच्या गोळ्या, व्याग्रा, आणि इंजेक्शन हस्तगत करण्यात आले.
गोवा ते डोंगरगड प्रवास – चौकशी दरम्यान बाबाने सांगितले की त्याने 20 वर्ष गोव्यात काढले आहेत. तेथे देखील तो विदेशी पर्यटकांना योग शिकवत होता. डोंगरगड ला तो दोन महिन्यापूर्वी आला आणि येथे त्याने प्रज्ञागिरी पहाडावर आश्रमाचे बांधकाम सुरू केले. सध्या आश्रमाचे बांधकाम पूर्ण होण्याच्या स्थितीत आहे
100 देशांची भ्रमंती आणि 10 एनजीओ – बाबाच्या मते तो 100 देश फिरला आहे. आणि त्याच्या 10 एनजीओ आहेत. त्यांच्याकडे विविध देशात योग शिक्षा दिल्याचे प्रमाणपत्र आढळले आहेत. पोलिस त्यांची तपासणी करीत आहेत.
आश्रम सील.चौकशी सुरू – पोलिसांनी बाबाचे आश्रम सील केले असून बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले आहेत . बाबाच्या या कृत्या मागे एखादे रॅकेट तर नाही ? याचा सुद्धा तपास केला जात आहे.