सामाजिक

शहरात बौद्ध पौर्णिमा निमित्त भव्य धम्म रॅलीचे आयोजन 

Spread the love
आर्वी / प्रतिनिधी
                 बौद्ध पौर्णिमा निमित्त शहरात भव्य धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आहे.ब
धम्म रॅली संध्याकाळी ६.०० वाजता प्रबुद्ध बुद्ध विहार गौरक्षण वार्ड आर्वी येथून सुरू होईल व शहराच्या प्रमुख मार्गाने फिरून समारोप बुद्ध विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे करण्यात येईल.
रात्री 8.00 वाजता समारोपिय कार्यक्रम आणि अल्पोपोहार चा कार्यक्रम  बुद्ध विहार डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर आर्वी येथे आहे.
पंचशील युवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने
समारोपीय कार्यक्रमात *धम्ममित्र सुरेश भिवगडे यांचे ” त्रिविध वैशाख पौर्णिमेचे महत्त्व” या विषयावर धम्मप्रवचन होईल
तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विशेष आकर्षक झाकी व सुंदर देखावा राहणार आहे.या कार्यक्रमाला बौद्ध बांधवसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती
विनीत  विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 133 वी जयंती उत्सव समिती आर्वी यांच्या वतीने करण्यात आली आहे.
मिरवणुकीचा मार्ग 
प्रबुद्ध बुद्ध विहार गौरक्षण वार्ड आर्वी येथून सुरुवात  गणपती मंदिर ते गांधी चौक गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नेताजी सुभाष चंद्र बोस पुतळा ते लकडगंज ते विठ्ठल मंदिर ते गुरुनानक धर्मशाळा ते जनता नगर समारोप बुद्ध विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर आर्वी.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close