हटके

अरे हा तर कुंभकर्णाचाही बाप निघाला ; वर्षातून 300 दिवस घेतो झोप

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                    झोपळू व्यक्तिला मिश्किलपणे ‘ अरे तू कुंभकर्ण आहेस का ‘ ? असे विचारल्यत्र जाते. कुंभकर्णाच्या बाबतीत सांगितले जाते की तो 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागा राहायचा.पण राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील भडवा गावातील एक  व्यक्ती झोपण्याच्या बाबतीत कुंभकर्णाचाही बाप असल्याचे समोर आले आहे. पुरखाराम असे त्याचे नाव असून तो 365 दिवसांपैकी 300 दिवस झोपून असतो. वास्तविक त्याला असा आजार जडला असल्याने असे होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

  राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील भडवा गावातील रहिवासी असलेल्या पुरखारामने त्याच्या असामान्य झोपण्याच्या पद्धतीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्यक्ती चक्क वर्षातील 365 दिवसांपैकी 300 दिवस झोपलेला असतो. यामागे एक गंभीर समस्या असल्याचं समोर आलं आहे. अ‍ॅक्सिस हायपरसोमनिया हा एक दुर्मिळ झोपेचा आजा आहे. हा व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहे.

ज्यामुळे तो वर्षातील तर 300 दिवस झोपेच्या अवस्थेत घालवतो. यामुळे अनेकांनी त्याची तुलना रामायणातील कुंभकर्णाशी केली. जो सहा महिने कोणताही त्रास न घेता झोपला होता.  पुरखाराम सुरुवातील कमी झोपायचा हळू हळू त्याचं झोपणं वाढलं आणि ते 300 दिवसांपर्यंत गेलं.

तो सुरुवातीला 15 तास झोपायचा. या गोष्टीमुळे त्याचे कुटुंबीयही चिंतेत होते. यासाठी त्याच्या कुटुंबियांनी वैद्यकिय मदतही घेतली. मात्र याचा काहीच फायदा झाला नाही आणि दिवसेंदिवस त्याची स्थिती अजूनच खराब होत गेली.

तो जास्तीत जास्त झोपू लागला. दरम्यान, पुरखारामची पत्नी, आई कुटुंबिय त्याची बरी होण्याची अपेक्षा करत आहेत. मात्र औषध घेऊनही त्याला थकवा जाणवतो. त्याला थकव्यासोबत डोक्यात तीव्र वेदनाही होतात.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close