राजकिय

बापरे… एकाच वेळी २०० नेत्यांचे निलंबन ,राजकीय वर्तुळात खळबळ

Spread the love

नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी

राजकीय क्षेत्रात काँग्रेस च्या एका आदेशाने खळबळ माजली आहे. रामलीला मैदानावर इंडिया आघाडी कडून आयोजित महारॅली मध्ये सहभागी न झाल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचे समजते.

व्होट बचाओ, देश बचाओ महारॅलीला उपस्थित न राहिल्याने ७ राज्यांमधील २०० हून अधिक नेत्यांना काँग्रेसकडून निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने गुजरातमधीस ४९, पश्चिम बंगालमध्ये २६, उत्तर प्रदेशात ११, तेलंगणामध्ये १४, हरियाणात १०, मध्य प्रदेशात ६० आणि झारखंडमधील ३२ नेत्यांना निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये राज्य युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि सचिव-स्तरीय नेत्यांचा समावेश आहे.

इंडिया आघाडीच्या महारॅलीकडे दुर्लक्ष करण्याबाबत समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात हे अधिकारी अपयशी ठरल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. इतर राज्यांतील काही नेत्यांवर देखील कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केलेल्या निवेदनात मध्य प्रदेश युवक काँग्रेसने सांगितले की, भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या निर्देशांचे पालन करून ही कारवाई करण्यात आली आहे.

भारतीय युवक काँग्रेसने सर्व राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरीय नेत्यांना मोर्चात सहभागी होणे अनिवार्य असल्याचे निर्देश दिले होते. काँग्रेसने आपल्या सर्व नेते, पदाधिकारी आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या उपस्थितांना ‘विथ आयवायसी’ या अधिकृत आयवायसी ॲपवर नोंदणी करण्यास सांगितले होते त्यांच्या उपस्थितीवर डिजिटल पद्धतीने लक्ष ठेवण्यासाठी मिंटो रोडवरील संमेलनस्थळी बारकोड स्कॅनरही बसवण्यात आले होते. यातूनच हे नेते महारॅलीला उपस्थित राहिले नसल्याचे दिसून आले त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close