विदेश

घरात झालेल्या गोळीबारात दोन लहान मुल गर्भवती महिलेसह 9 लोकांचा मृत्यू 

Spread the love

पेनसिल्व्हेनिया / विशेष प्रतिनिधी 

अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील एरी येथे शुक्रवारी संध्याकाळी एका घरात झालेल्या गोळीबारात दोन लहान मुलांसह एका गर्भवती महिलेचा समावेश असलेल्या किमान नऊ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या गोळीबारातील संशयित हल्लेखोराचाही नंतर मृत्यू झाला. त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार 9 ऑक्टोबर रोजी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सुमारे 5 वाजता गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना पेरी स्ट्रीटवरील 700 क्रमांकाच्या परिसरातील एका घरात बोलावण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना घराबाहेर दोन महिलांचे मृतदेह आढळले. तर अन्य मृत व्यक्ती घराच्या आत आढळून आल्या, अशी माहिती ‘एरी न्यूज नाऊ’ आणि ‘केबीटीएक्स न्यूज 3’ या स्थानिक माध्यमांनी दिली.

तपासकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताने सर्वप्रथम घराबाहेर असलेल्या दोन महिलांवर गोळीबार केला. त्यानंतर तो घरात शिरला आणि आत असलेल्या अनेक जणांवर गोळ्या झाडल्या. पुढे त्याने स्वतःला घरात कोंडून घेतले. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि स्वॅट पथकांसह पोलिसांना घटनास्थळी तैनात करण्यात आले. संशयिताला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात कारवाई सुरू केली.

या घटनेचे वर्णन करताना सांगितले की, पोलिस अधिकारी आणि तपासकर्त्यांनी आजवर हाताळलेल्या सर्वांत कठीण घटनांपैकी ही एक घटना आहे. या गोळीबारात झालेली जीवितहानी अत्यंत वेदनादायक असल्याचे एरीचे पोलीस प्रमुख रिक लोराह यांनी सांगितले. तसेच गोळीबारामागील परिस्थिती आणि घटनाक्रमाचा अद्याप तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अखेर संशयित हल्लेखोराचा मृतदेह आढळून आला. त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी पोलीस प्रमुख रिक लोराह यांनी केली.

या गोळीबारामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच संशयित आणि मृत व्यक्ती यांच्यात नेमके काय नाते होते, याचीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची ओळखही पोलिसांनी अद्याप जाहीर केलेली नाही.

येथे झालेल्या जीवितहानीचे गांभीर्य व्यक्त करण्यासाठी योग्य शब्दच नाहीत, असे रिक लोराह यांनी सांगितले. नेमके काय घडले, हे स्पष्ट करण्यासाठी तपासकर्त्यांना वेळ लागेल, असेही त्यांनी नमूद केले.

घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये घराबाहेर पोलिसांची अनेक वाहने दिसत होती. घरात स्वतःला कोंडून घेतलेल्या संशयितामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. घटनास्थळी उपस्थित असलेले ‘एरी न्यूज नाऊ’चे छायाचित्रकार ख्रिस पीटरसन यांनी या परिस्थितीचे वर्णन गोंधळाची असल्याचे केले. गोळीबाराचे आवाज ऐकू येत असताना अनेक लोक त्या परिसरातून पळून जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच, सर्वसामान्य नागरिकांना आता कोणताही धोका नसल्याचेही त्यांनी सांगितले.

एरी शहर प्रशासनाने फेसबुकवर निवेदन प्रसिद्ध करून या गोळीबारातील मृत व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना श्रद्धांजली वाहिली. तसेच या घटनेमुळे प्रभावित झालेल्या इतर नागरिकांप्रति संवेदनाही व्यक्त केल्या.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close