शैक्षणिक

गणित ज्ञान-विज्ञान परीक्षेत जनता विद्यालयाचे घवघवीत यश!:-

Spread the love

 

आराध्या अंबाडकर शाळेत प्रथम; ऋषिकेश तलमलेचा तालुकास्तरावर तृतीय क्रमांक

अंजनगाव बारी : प्रतिनिधी

अमरावती जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने आयोजित गणित ज्ञान-विज्ञान परीक्षेत जनता विद्यालय, अंजनगाव बारी येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या परीक्षेत इयत्ता नववी ‘अ’ मधील आराध्या सतीश अंबाडकर हिने शाळास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. तसेच इयत्ता सहावी ‘ब’ मधील ऋषिकेश प्रमोद तलमले यानेही शाळास्तरावर प्रथम क्रमांक मिळविण्यासोबतच तालुकास्तरावर तृतीय क्रमांक पटकावून विद्यालयाचा गौरव वाढविला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य गजेंद्र अवघड, पर्यवेक्षिका मनीषा चिंचोळकर आणि गणित शिक्षिका अश्विनी ढोले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अमरावती येथे गटशिक्षणाधिकारी व संबंधित पदाधिकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close