प्रेमाची शिक्षा सर्वांसमोर ठेवायला लावले शारीरिक संबंध आणि पाजली लघवी

या जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी आणि अंगावर काटा आणणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत राहण्यास गेलेल्या एका विवाहितेला पकडून आणत, तिच्यावर ‘शुद्धीकरणा’च्या नावाखाली अमानुष आणि विकृत अत्याचार करण्यात आले.
पीडित महिलेला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली आणि ज्या पुरुषासोबत ती गेली होती, त्याच्यावरच सर्वांसमोर तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन महिलांसह एकूण ९ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
घरातून पळून गेली अन् पतीने शोधून आणले पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या पतीला सोडून दुसऱ्या एका पुरुषासोबत राहण्यासाठी निघून गेली होती. यानंतर पतीने आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला शोधून आणले व घरात डांबून ठेवले होते. मात्र, संधी मिळताच ती महिला पुन्हा घरातून निसटली आणि त्याच पुरुषाकडे गेली. संतापलेल्या पतीने आणि गावातील काही लोकांनी दोघांचा कसून शोध घेतला आणि अखेर दोघांनाही पकडून सुरेंद्रनगर येथे परत आणले.
दोन महिलांसह ९ आरोपींना अटक हा किळसवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. सुरेंद्रनगरचे पोलीस अधीक्षक प्रेमसुख डेलू यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी तातडीने हालचाली करत पीडित महिलेचा शोध घेतला, तिला वैद्यकीय मदत पुरवली आणि तिची सविस्तर साक्ष नोंदवली. व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून पतीसह दोन महिला आणि इतर पुरुषांसह एकूण ९ आरोपींना अटक केली आहे.पोलीस या प्रकरणी पुढील कठोर कायदेशीर कारवाई करत आहेत.




