क्राइम

लाचखोर पोलिस कर्मचाऱ्याला ACB ने रंगेहाथ पकडले

Spread the love
बीड : समन्स बजावण्याच्या मोबदल्यात आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीड शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी दुपारी रंगेहात पकडले. या धडक कारवाईमुळे बीड पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सुशेन प्रकाश उगले असे लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो बीड शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. एका प्रकरणातील समन्स संबंधिताला बजावण्यासाठी उगले याने आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबात जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, जालना एसीबीच्या पथकाने दुपारी बीडमध्ये सापळा रचला. तक्रारदाराकडून ८ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना सुशेन उगले याला पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.
कर्मचारी जाळ्यात, पोलिस निरीक्षक अडचणीत
जालना एसीबीचे पोलीस उपअधीक्षक बाळू जाधवर यांनी या यशस्वी कारवाईची माहिती दिली असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वीही जालना एसीबीने बीडमध्ये अनेक कारवाया केल्या आहेत. तसेच कर्मचारी पकडल्याने आता शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद घोळवे हे देखील अडचणीत आले आहेत. पोलिस अधीक्षक पाटोदा प्रमाणेच घोळवे यांची उचलबांगडी करून नियंत्रण कक्षात घेणार की माजलगाव शहर आणि दिंद्रूड प्रमाणे अभय देणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close