सामाजिक

आगीत अडकलेल्या लोकांना मदत करणारा गादी व्यापारी रियाजुद्दीन अडचणीत 

Spread the love
दिल्ली /विशेष प्रतिनिधी
                   दिल्लीतील मालवीय नगर येथील हॉटेल ला लागलेल्या आगीत 21 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी आगीत अडकलेले लोक स्वतःला वाचविण्यासाठी गॅलरीतून उडी मारण्याच्या तयारीत होते. पण दुखापत होण्याच्या भीतीने ते घाबरत होते. यावेळी हॉटेल च्या बाजूला असलेल्या रियाजुद्दीन नामक गादी व्यापाऱ्याने आपल्या दुकानातील गाद्या रस्त्यावर अंथरल्या. त्यावर उडी घेत अनेकांनी आपला जीव वाचवला. परंतु सेवाभावी वृत्तीने मदत करणारा रियाजुद्दीन आता स्वतः अडचणीत आला आहे. त्याच्या मते त्याचे 2 लाखाचे नुकसान झाले आहे.आणि पुढे त्याच्या मुलीचे लग्न आहे. त्यामुळे ते अडचणीत आला आहे.

हॉटेलच्या समोर रियाजुद्दीन आणि त्यांचे पुत्र अरमान मंसुरी यांचं गाद्यांचं दुकान आहे. आग लागल्यावर अनेकांनी हॉटेलच्या वरच्या मजल्यांवरून खाली उडी मारण्याची तयारी सुरू केली. पण खाली पडल्यावर त्यांना गंभीर दुखापत होण्याची दाट शक्यता होती. हा धोका लक्षात घेता रियाजुद्दीन आणि त्यांच्या मुलानं समयसूचकता दाखवत दुकानातील गाद्या रस्त्यावर अंथरल्या. त्यामुळे ८ जणांचा जीव वाचला. पण यामुळे रियाजुद्दीन यांचं जवळपास दीड ते दोन लाख रुपयांचं नुकसान झालं

बचाव कार्यासाठी आम्ही दुकानातील बरंच सामान वापरलं. यामुळे व्यवसायाचं बरंच नुकसान झालं. पण अद्याप तरी प्रशासनातील कोणीही नुकसान भरपाई देण्यासाठी समोर आलं नसल्याची खंत रियाजुद्दीन यांनी बोलून दाखवली. रियाजुद्दीन यांनी हॉटेलच्या आगीत मरण पावलेल्यांना घेऊन जाण्यासाठी त्यांच्या दुकानातील चादरी, पांघरुणं दिली. आमच्या दुकानातील सामान लोकांच्या कामी आल्याचा अभिमान असल्याचं रियाजुद्दीन यांचे पुत्र अरमान यांनी सांगितलं.
युद्धामुळे आधीच व्यवसाय अडचणीत आहे. त्यात आता दीड ते दोन लाखांचं नुकसान झालं. माझ्या लेकीचा निकाह ठरला आहे. लोकांना वाचवल्याचं समाधान नक्कीच आहे. पण दुकान रिकामी झाल्यानं अडचण झाली आहे. आमचं दीड-दोन लाखांचं नुकसान झालं आहे. आम्हाला मदत मिळाली तर आम्ही पुन्हा उभे राहू शकतो. अन्यथा अडचणी येतील, अशी आपबिती त्यांनी मांडली.
दोन महिन्यांनंतर लेकीचं लग्न आहे. बराच खर्च आहे. दुकानातला मालच संपला. आम्ही छोटे व्यावसायिक आहोत. आमच्यासाठी दीड-दोन लाख मोठी रक्कम आहे. हेच दुकान आमच्यासाठी रोजीरोटीचं साधन आहे. नुकसान भरुन कसं काढायचं, हा प्रश्न आता आमच्यासमोर आ वासून उभा असल्याचं रियाजुद्दीन यांनी सांगितलं.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close