राजकिय

आपच्या झाडूने भाजपा साफ 

Spread the love
 
पंजाब / विशेष प्रतिनिधी 
                  पंजाब मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत आप ने भाजपा ला धूळ चारली आहे. 680 जागांवर आप ने विजय मिळविला आहे.तर भाजपा ला केवळ 52 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 
 राजकीय तज्ज्ञांच्या मते पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये झालेला भाजपचा पराभव हा भाजपसाठी केवळ एक इशारा नसून विधानसभा निवडणुकीपूर्वी धोक्याची घंटी आहे. पंजाबमध्ये स्थानिक मुद्दे हे राष्ट्रीय मुद्द्यांवर भारी पडल्याचं दिसून येत आहे. भाजपला अजूनही पंजाबमध्ये पुरेसा जनाधार नसल्याचं या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलं आहे. आप हा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये राज्यात नंबर एकचा पक्ष ठरला आहे. आपने प्रचंड यश या निवडणुकीमध्ये मिळवलं आहे.

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने भाजपला मोठा झटका दिला आहे. पंजाबमध्ये 26 मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं होतं. ज्यामध्ये आठ महानगर पालिका, 75 नगर परिषद आणि 20 नगर पंचायतींच्या निवडणुकीचा समावेश होता. आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीमध्ये आपने जोरदार मुसंडी मारली आहे. तब्बल 680 पेक्षा अधिक जागांवर आपचे उमेदवार विजय झाले आहेत. तर भाजपला अवघ्या 52 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पंजाबमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील आपचं वादळ आल्याचं पहायला मिळत आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हा भाजपला बसला आहे. तर काँग्रेस आणि आकाली दलाचा देखील मोठा पराभव झाला आहे. या निवडणूक निकालावरून स्पष्ट झालं आहे की, अजूनही पंजाबमध्ये आपची जादू कायम आहे. हा भाजपसाठी मोठा झटका मानला जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close