क्राइम

अश्लील व्हिडिओ पाहून नातेवाईकाने केले असे की उसळली संतापाची लाट 

Spread the love
  •  बीड / विशेष प्रतिनिधीं

अश्लील व्हिडिओ पाहून एका १५ वर्षीय तरुणाने आपल्याच नात्यातील अडीच वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याने तिचा मृत्यू झाला आहे. सुरवातीला अकास्मिक मृत्यू वाटणाऱ्या या प्रकरणात डॉक्टरांना शवविच्छेदन करताना वेगळीच शंका आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना कळविल्यावर हा प्रकार समोर आला.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या चिमुकलीचा १७ मार्च २०२६ रोजी घरासमोरील पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा केवळ अपघात वाटत असल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदन करताना मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निदर्शनास आणून दिले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी अत्यंत गोपनीयरीत्या माहिती गोळा केली. पीडितेच्या मृत्यूनंतर संशयित आरोपी असलेला तिच्या आत्याचा १५ वर्षीय मुलगा ३ दिवस जेवला नव्हता आणि सतत रडत होता, अशी माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली. या संशयावरून पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पीडितेच्या मृत्यूपूर्वी आठ दिवस अगोदर आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या दुचाकीवर बसवून नेले आणि घरात कोणी नसताना मोबाईलवरील अश्लील व्हिडीओ पाहून तिच्यावर अत्याचार केले. त्यापूर्वी देखील त्याने तिच्यावर एकदा अत्याचार केल्याची कबुली दिली.

या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(१) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियम २०१२ च्या कलम ४, ६, ८ आणि १२ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी स्वतः सरकारतर्फे फिर्यादी होऊन एका गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पिंक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधवर यांच्याकडे सोपवण्यात आला असून. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close