लाहोटी महाविद्यालया मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.
मोर्शी / प्रतिनिधी
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित श्री. आर. आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालय, मोर्शी येथे राष्ट्रीय सेवा योजना पथका तर्फे गुरुवार दि. २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्ताने प्राचार्य डॉ. जी.एन.चौधरी यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी आय.क्यू.ए.सी. विभाग प्रमुख डॉ. आतिश कोहळे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. अविनाश उल्हे, रासेयो सहकार्यक्रम अधिकारी डॉ. शशिकांत इखे, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. विजया चव्हाण, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. जी.सी. कांबळे, प्रा. विलास अंबाडकर, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अश्विन लुंगे, पदार्थ शास्त्र विभाग प्रमुख डॉ. जी.बी.हरडे , रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. जी.डी. रावते, डॉ. रविकांत धांडे, डॉ. दिनेश पुंड, डॉ. जयसिंगपूरे, डॉ. शीतल पारे, डॉ. सोनाल बाकडे, डॉ. नागेश नाहते, प्रा. सुजित पांडे, प्रा. हर्षल देशमूख, प्रा. चिखले, प्रा. राहुल बेहरे, प्रा. राहूल काकडे, प्रा. मोडक, शेखर चौधरी, जगदीश सुर्वे, अंकित औतकर, महाविद्दालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व रासेयो स्वंयसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.