शैक्षणिक

शिवाजी हायस्कुल येथे आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम

Spread the love

ओंकार काळे / मोर्शी

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती व *N.D.R.F* रेस्क्यू टीम यांच्यातर्फे शिवाजी हायस्कूल मोर्शी येथे आपत्ती व्यवस्थापन या विषयावर जनजागृती चा कार्यक्रम घेण्यात आला
कार्यक्रमाला लाभलेले शाळेचे मुख्याध्यापक एस आर देशमुख सर व तसेच जिल्हा शोध व बचाव पथकाचे मास्टर ट्रेनर भूषण वैद्य साहेब, मास्टर ट्रेनर रविभाऊ शहाकार साहेब (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त), मास्टर ट्रेनर गणेश जाधव साहेब. तसेच एनडीआरएफ रेस्क्यू टीम एएसआय बिरेंद्रकुमार जयस्वाल साहेब, यांच्यासह टीम व आपदा मित्र प्रियांशू तायवाडे, विवेक सावरकर, सतीश खंडारे, अंजली फंदे, फाल्गुनी बारस्कर, व शाळेमधील शिक्षक वर्ग लाभलेले होते. शिवाजी हायस्कूल येथील वर्ग शिक्षक व कर्मचारी तसेच NCC विद्यार्थी, स्काऊट गाईड, यांना आपत्ती व्यवस्थापन याविषयी माहिती व प्रात्यक्षिक जिल्हा शोध व बचाव पथकाने केले. आपत्ती व्यवस्थापन हे एक काळाची गरज आहे. आपत्ती उद्भवल्यास आपण स्वतः सुरक्षित राहून दुसऱ्याचा प्राण कशाप्रकारे वाचवू शकतो या मध्ये पुर .आग. विज . रस्ता अपघात .यापासून स्वतः दुसऱ्यांना कशा प्रकारे मदत कार्य करू शकतो. यामध्ये प्रशासन आपली भूमिका कशाप्रकारे बजावते.शासन कशाप्रकारे मदत करते .नागरिकांचे कर्तव्य काय आहे. टाकाऊ वस्तु पासून कशाप्रकारे डिवाइस तयार करू शकतो. गावामध्ये पुराचे पाणी शिरल्यावर सर्वप्रथम काय उपाय योजना करायला पाहिजे विजेवर चालणारे उपकरणांचा पुरवठा ताबडतोब खंडित करावा .मान्सून कालावधी मध्ये जमिनीवर विजा पडण्याचे प्रमाण खूप असते त्यामधे आपण काय करायला पाहिजे .विजा चालू असताना आपण कशाचा आधार घ्यायला पाहिजे.शेता मध्ये काम करत असताना विजा पडत असेल तर आपण शेता जवळील घराचा आसरा त्वरित घ्यायला पाहिजे . आग लागली असेल तर ती विजवण्यासाठी फायर सिलेंडर कसे हाताळायचे. आग कशी आटोक्यात आणायची. आणि फायर सिलेंडर चे प्रकार बद्दलची माहिती देण्यात आली तसेच रस्ता अपघाताबद्दल रस्त्यावर जर अपघात झाला असेल तर सर्वप्रथम आपण काय करायला पाहिजे. अपघात ग्रस्तांना आरोग्य केंद्र पर्यंत प्रथमोपचारासाठी घेऊन जाण्याच्या पद्धती .अमरावती जिल्ह्यामध्ये आपत्ती आल्यानंतर सन 2023 मध्ये *D.D.R.F.* जिल्हा शोध व बचाव पथकानी केलेली व *N.D.R.F* . रेस्क्यू टीम ची कामगिरीची माहिती सागण्यात आली .प्रात्यक्षिक दाखविण्यात आले . या संपूर्ण विषयाबद्दल ची माहिती व प्रशिक्षण अधिकारी व कर्मचारी तसेच NCC व स्काऊट गाईड चे विद्यार्थी यांना यशस्वीरित्या समजून सांगितली .

*यावेळी जिल्ह्यात उद्भवणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी आपण सर्वांनी जनजागृती व सहकार्य करावे तसेच सर्वांनी सुरक्षित राहण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले*

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close