शेती विषयक

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खरीप हंगाम 2023 च्या 40079सोयाबिन व 6210 कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य

Spread the love

नांदगाव खंडे / प्रतिनिधी

मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर च्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसाहाय्य खरीप हंगाम 2023 ला ई पीक- पाहणी अँप वर नोंद असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. 0.20 हे पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट 1,000 रुपये मदत मिळणार आहे तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्र मर्यादेप्रमाणे प्रति हेक्टरी 5,000 हजार रु. मदत मिळणार. राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामा मध्ये ई- पीक पाहणी अँप वर कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केलेली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसाहायाकरिता पात्र राहतील. पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित कृषी सहायक यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर योजनेचा लाभ घेण्याकरता आवश्यक कागदपत्रे.
आधार कार्ड ची छायांकित प्रत.
संमती पत्र सामायिक खातेदार असल्यास, सामायिक खातेदार नाहरकत पत्र हे कागदपत्रे आवश्यक असतील
संमती पत्र व ना हरकत पत्राचा नमुना तालुक्यातील झेरॉक्स सेंटर वर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तरी वरील प्रमाणे पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ आवश्यक कागदपत्रे संबंधित कृषी सहायक यांच्याकडे जमा करावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री रोशन इंदोरे यांच्या मार्फत करण्यात आले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close