क्राइम

कामनापूर घुसळी येथे पतीने केला पत्नीचा खून 

Spread the love
कुऱ्हाडीने घाव घालत झाडले यमसदनी
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी 
          तालुक्यातील कामनापूर घुसळी येथे पतती ने पत्नीची कुऱ्हाडीचे घाव घालत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती होताच तळेगाव पोलीस घटस्थळी दाखल झाले. आणि पंचनामा केला.
         उपलब्ध माहिती नुसार आरोपी मधुकर नारायण तातलाम 60 हा पत्नी लता मधुकर तातलाम 53 सोबत कामनापूर घुसळी येथे राहत होता. काही दिवसांपूर्वी लता ही मधुकर याला न सांगता घरातून निघुन गेली होती. आणि दोन दिवसानंतर परतली होती. यामुळे मधुकर। कमालीचा संतापला होता.
         मधुकर लता ला कुठे गेली होती ? अशी विचारणा करत होता पण लता काहीच सांगायला तयार नव्हती. त्यामुळे मागील दोन – तीन दिवसांपासून त्यांच्यात कडाक्याचे भांडण सुरु होते. काल दि . 27 ला त्यांच्यात पुन्हा याच कारणावरून वाद झाला. त्यावेळी मृतक लता ने मी तुमच्या सोबत राहून कंटाळली . आता मला तुमच्या ओबात राहायचे नाही. मी दुसरे लग्न करणार आहे. असे म्हटले त्यावरून तो भयानक संतापला. यानंतर दोघे झोपी गेले.
           मधुकर च्या मनात राग खदखदत असल्याने तो रात्री 3 वा. चे दरम्यान उठला. आणि घरात ठेवलेल्या कुऱ्हाडीने लता च्या मानेवर आणि डोक्यावर सपासप वार करून तिचा खून केला . लता ने घटनास्थळावरच दम तोडला. घटनेची माहिती होताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपी मधुकर विरोधात अपराध क्र. 190/ 2024 भादवी कलम 302 नुसार गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे.
What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close