क्राइम

नेहाचा ‘ सर तन से जुदा ‘ चा प्रयत्न  ; हुबळी नेहा हिरेमठ हत्याकांड

Spread the love

हुबळी / नवप्रहार मीडिया 

                  बीव्हीबी कॉलेजमध्ये एमसीएचे शिक्षण घेतअसलेल्या नेहा हिरेमठ या युवतीवर फैय्याज नामक तरुणाने कॅम्पस मध्ये शिरून चाकूने हल्ला करून तिला ठार मारले होते. तिच्यावर फैय्याज ने 14 वार केल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पस्ट झाले आहे. ती खाली पडल्यावर देखील फैय्याज तिच्यावर वार करत होता. त्याने तिचा गळा चिरण्याचा देखील प्रयत्न केला. वास्तविक त्याचा  नेहाचा  ‘ सर तन से जुदा  ‘ करण्याचा प्लॅन होता असे म्हटल्या जात आहे.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून अनेक मोठे खुलासे

शवविच्छेदन अहवालात आरोपी फैयाजने नेहाच्या छातीवर आणि मानेवर चाकूने वार केल्याचे म्हटले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टचा हवाला देत सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, “नेहाच्या मानेवर अनेक वेळा हल्ला झाला आणि त्यामुळे तिच्या शिरा कापल्या गेल्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त वाहू लागले, त्यानंतर नेहाचा मृत्यू झाला.”

गळा चिरण्याचाही प्रयत्न केला

पोस्टमॉर्टम रिपोर्टचा हवाला देत पोलिस सूत्रांनी सांगितले की, नेहाच्या छातीवर आणि पोटावर आधी हल्ला झाला होता, पण ती पडताच फैयाजने तिच्या संपूर्ण शरीरावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. आरोपींनी तिचा गळा चिरण्याचाही प्रयत्न केला होता.

फैयाज याला धर्मांतर करायचे होते

नेहा हिरेमठ ही हुबळी येथील बीव्हीबी कॉलेजमध्ये एमसीएचे शिक्षण घेत होती. तिचा प्रियकर फैयाज कोंडिकप्पा याने तिची हत्या केली होती. दोघेही बीसीएमध्ये एकत्र शिकत होते आणि मित्र होते. फैयाजने बीसीएनंतरचे शिक्षण थांबवले होते. नेहाचे वडील आणि काँग्रेस नगरसेवक म्हणाले की, आरोपीला अनेक वर्षांपासून त्यांच्या मुलीचे जबरदस्तीने धर्मांतर करायचे होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close