सामाजिक

साप्ताहिक वर्तमानपत्रांना सुद्धा दैनिका प्रमाणे जाहिराती द्या – व्हॉइस ऑफ मीडिया

Spread the love
वर्धा /आशिष इझनकर 
              साप्ताहिक वर्तमानपत्रांना सुद्धा दैनिकाप्रमाणे दर्शनी जाहिरात देण्यात यावी यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटने द्वारे मुख्यमंत्र्यांना तहासीलदारां मार्फत निवेदन देण्यात आले.  या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी जाहिरातींची विनंती करत शासनाने याकडे लक्ष न दिल्यास उपोषणाचा गर्भित ईशारा देखील दिला आहे.
 या निवेदनात आपली बाजू मांडताना संघटनेने म्हटले आहे की दिनांक 6 मार्च, 7 मार्च व 8 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा दैनिक वृत्तपत्रांना विकसित भारत व विकसित महाराष्ट्रच्या दर्शनी जाहिरात वितरित करण्यात आलेल्या आहेत, परंतु या जाहिराती वाटपात महाराष्ट्रातील साप्ताहिकांना डावलण्यात आले. विकासात्मक धोरणाच्या जाहिराती देताना सर्व वृत्तपत्रांना समान जाहिराती वाटप व्हायला पाहिजे, असे धोरण महाराष्ट्र शासनाने राबवावे, जेणेकरून लघु वृत्तपत्रांवर अन्याय होणार नाही. या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विकासाला वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत शासनाच्या योजना व्यापक प्रमाणात पोहोचवता येतील.
साप्ताहिक हा शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पोहोचणारा दुवा म्हणून काम करतो. आपल्या शासकीय योजना, चांगुलपणाचे अनेक विषय साप्ताहिकच लोकांपर्यंत पोहोचवतात. त्याच साप्ताहिकांना डावलण्याचे काम सतत होत आहे. उत्तम बातम्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे माध्यम साप्ताहिक आहे. त्याच पद्धतीने आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा निरोप साप्ताहिकवालेच उतम पद्धतीने करतात. कृपया मागे झालेल्या अभियानात या जाहिराती देण्यात याव्यात. आणि पुढच्या सर्व अभियान, उपक्रमाच्या जाहिरातीमध्ये आम्हाला डावलण्यात येऊ नये. हा एकच विषय नाही यापूर्वीच्या अनेक विषयांमध्ये साप्ताहिकाला डावलण्याचं काम होत आले आहे.  साप्ताहिकांना आपण न्याय देण्याची भूमिका घ्या. , आपण जाहिराती का दिल्या नाहीत? आणि यापुढे आपण जाहिराती देणार तर कशा देणार? याबाबत स्पष्टीकरण देणारे पत्र आपण काढावे. आपण तसे पत्र जर काढले नाही तर आम्हाला नाईलाजास्तव राज्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, माहिती कार्यालय आणि मंत्रालयाच्या समोर उपोषणाला बसावे लागेल.  असा इशारा देत न्यायाची अपेक्षा केली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close