ब्रेकिंग न्यूज

काही चाटुकार पत्रकारांमुळेच दत्तापुर पोलीसात ‘ मॅनेज सिस्टम ‘

Spread the love
नवप्रहार मध्ये बातमी प्रसिद्ध होताच संबंधित अधिकारी आणि चमूचे धाबे दणाणले
चिरीमिरी घेऊन रफादफा करण्यात आलेल्या जुगार प्रकरणात दाखवली जप्ती 
बालाजी मंगल कार्यालय येथील प्रकरण 
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी 
                     रात्री गस्तीवर असलेल्या दत्तापुर पोलिसांच्या चमूने बालाजी मंगल कार्यालयात सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकून 18 आरोपींना अटक केली होती. पण सदर प्रकरणाला मूठमाती देण्याच्या उद्देशाने संबंधित अधिकाऱ्याने हे प्रकरण ‘चिरीमिरी ‘ घेऊन मॅनेज केले होते. पण नवप्रहार मध्ये बातमी प्रसिद्ध होताच कारवाईच्या बडग्याने धास्तावलेल्या अधिकाऱ्याने एका चाटुगिरी करणाऱ्या पत्रकाराला हाताशी घेऊन कारवाईची बातमी छापून घेतली आहे. त्यामुळे असा चाटुगिरी करणारा पत्रकार जनतेला काय न्याय मिळवून देईल ? असा रास्त प्रश्न उभा ठाकला आहे. या वर्तमान पत्राच्या वरिष्ठ लोकांनी याकडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता असल्याचे जनतेचे म्हणणे आहे.
                      दि.22 ऑगस्ट च्या रात्री गस्तीवर असलेल्या दत्तापुर पोलीस स्टेशन च्या चमूने रंगोली बार च्या मागे असलेल्या बालाजी मंगल कार्यालयात सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकली होती. त्यात जवळपास 18 ते 20 लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना दत्तापुर ठाण्यात आणण्यात आले होते. दरम्यान नेहमी प्रमाणे काही लोकांनी यात सेटलमेंट घडवून आणल्याने या लोकांवर कुठलिही कारवाई न करता सोडून देण्यात आले होते.
नवप्रहार मध्ये बातमी प्रसिद्ध होताच संबंधितांचे धाबे दणाणले –  ही बाब सत्य कुठल्याही परिस्थितीत दाबल्या जाऊ नये या विचारावर  कार्य करणाऱ्या नवप्रहार ला ही घटना माहीत झाल्यावर नवप्रहार ने ही बातमी प्रसिद्ध केली होती. यानंतर रात्री गस्तीवर असलेल्या चमूला वरिष्ठांकडून जाब विचारण्यात आला होता. फटफजिती झाल्याने या चमूने एका चाटुगिरी करणाऱ्या पत्रकाराला हाताशी धरून कारवाई करण्यात आल्याची  बातमी छापून घेतली.
2 लाखाच्या घरात मांडवली झाल्याची चर्चा – या प्रकरणात रात्रीच 2 लाखात मांडवली झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू होती. आणि याच मुळे आरोपींना रात्रीच सोडून देण्यात आले होते. बातमी प्रसिद्ध झाल्यावर फटफिजिती रोकण्यासाठी चाटुगिरी करणाऱ्या पत्रकाराला  हाताशी धरून बातमी प्रसिद्ध करण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात पोलीस विभागात सुरू आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Close
Close