किरीट सोमयाच्या अश्लील कृत्याचा शिवसेनेच्या महिलांनी चपला,लाथा मारून केला निषेध,
मुलाने तोंडावर केली लघुशंका, महामार्गावरील वाहतूक खोळंबली,अनेक कार्यकर्ते उपस्थित..
नेर :- नवनाथ दरोई
किरीट सोमयाच्या अश्लील कृत्याचा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चला ऊत आला आहे. सोमयाने केलेल्या कृत्याचा नेर येथील स्व: बाळासाहेब ठाकरे यांच्या शिल्पाजवळ शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी बॅनर वरील सोमयाच्या फोटोला चपलाने,लाथीने मारुन निषेध केला. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यर्कत्यानी लाथा, जोडे मारून त्यांच्या फोटोच्या बॅनरला यवतमाळ अमरावती महामार्गावर टाकून त्यांच्या तोंडावर मुलाकडून लघुशंका करण्यात आली. यावेळी दोन्ही बाजूची वाहतूक काही वेळ खोळंबली होती. भाजपाच्या इतरही नेत्याप्रमाणे सोमयाचे प्रकरण चित्रा वाघ यांनी उघडकिस आणावे असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिलांनी बोलून दाखविले. यावेळी शिवसेनेच्या महिला प्रमुख आशा मिसळे, वंदना ऊके,जोश्न्ना बगमारे, तालुकाप्रमुख नितीन माकोडे,शहर प्रमुख खुशाल मिसाळ, युवा सेना जिल्हाप्रमुख संकेत ठाकरे,युवा सेना विधानसभा उपाध्यक्ष नितीन कराळे,अनिल चव्हाण, गजानन दहेलकर, जय माहुरे, विनोद रंगारी, अशोक फुलझाडे, बंडू देशमुख, मनोज शेंदूरकार व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते..