पत्नीचा प्रियकर व त्याचे साथीदाराचे मदतीने झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा काही तासातच उलगडा
स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण ची कार्यवाही
प्रतिनिधी मुबीन शेख
शिरखेड पोलीस स्टेशन च्या हद्दीतील राजूरवाडी शेत शिवारात भावाचा मृतदेह आढळून आल्याने सतीश वसंतराव धुर्वे ४७ यांनी शिरखेड ठाण्यात तक्रार नोंदवली होती. मृतदेहाची पाहणी केल्यावर मृत इसमाचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींचा शोध लावण्याच्या सूचना पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी दिल्या होत्या.
. सदर घटनेचे अनुषंगाने मा.शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. निलेश पांडे, उप विभागीय पोलीस अधिकारी, मोर्शी, तपन कोल्हे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा , अमरावती ग्रा. यांनी तात्काळ घटनास्थळी
भेट देवुन घटनास्थळाची पाहणी केली.
घटनास्थळाची पाहणी करून अधिनस्थ पथकास गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने सुचना देण्यात आल्या असता पथकाने सदर गुन्हयातील मयत यांची व त्यांचे कुटूंबीयांची पार्श्वभुमी बाबत सविस्तर माहीती घेतली असता गोपनिय माहीती प्राप्त झाली की, मयत हयाचे पत्नीचे गावातीलच आरोपी इसम नामे बबलू ऊर्फ इजाज खाँ शब्बीर खॉ पठाण, वय ४० रा. राजुरवाडी याचे अनैतीक संबंध असुन सदर बाब मयत याचे लक्षात आली असता तो त्याचे पत्नीस शाररीक व मानसिक त्रास देवु लागला होता. संदर बाबत त्याचे पत्नीने तिच्या प्रीयकरास सांगतली असता त्याने त्याचे साथीदाराससह मयत हयाचा खुन करण्याचा कट रचून दि. २९/०४/२०२३ रोजी राजुरवाडी शेत शिवारात मयत यास बोलावुन नेले व तेथे त्याचा गळा आवळुन खुन केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर गुन्हयात मयत हयाचे पत्नीचा प्रीयकर १) बबलू ऊर्फ इजाज खाँ शब्बीर खॉ पठाण, वय ४० रा. राजुरवाडी त्याचे साथीदार २) सागर रमेशराव मातकर, वय ३० वर्षे, रा. राजुरवाडी ३) कृणाल जानराव उईके, वय २४, रा. तळेगाव ठाकुर ४) विधीसंघर्षीत बालक रा. तळेगांव ठाकुर यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयांची कबुली दिली आहे.
सदरची कार्यवाही मा. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण. मा.शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण. निलेश पांडे, उप विभागीय पोलीस अधिकारी, मोशी यांचे मार्गदर्शनात तपन कोल्हे. पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा , अमरावती ग्रामीण. यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णु पांडे, पोलीस उपनिरीक्षक .नितीन चुलपार, पोलीस अमलदार संतोष मुंदाने , बळवंत दाभणे, पंकज फाटे, मनोज टप्पे, शकील चव्हाण, मोहन मोरे, सांगर धापड, चेतन गुल्हाने, प्रमोद शिरसाठ महीला पोलीस अमंलदार सरिता चौधरी यांचे पथकाने केली.