अवैधरित्या देशी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीस अटक
गुन्हेशाखा युनिट क. ५ पोलीसांची कामगिरी
नागपूर / अमित वानखडे
दिनांक २३ मार्च २३ चे आठ वाजता ते नऊ वाजता चे सुमारास गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार हे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहीती वरून आरोपी झलेन्द्र किशनु लोधी वय ३५ वर्ष, रा. डिप्टी सिग्नल झोपडपट्टी, राममंदीर जवळ, नागपूर यास मिनीमाता नगर, गल्ली न. ९, आदर्श किराणा जवळ, दुर्गाबाई बारले यांचे घरी पंचासह रेड कारवाई केली असता, आरोपी जवळ १) एक देशी बनावटी गावठी कट्टा किं.अं.१०,०००/- रू २) एकुण ७ जिवंत काडतुस प्रत्येकी कि. अं. १०००/- रू प्रमाणे असे एकुण ७०००/-रू ३) एक jalsa prime कंपनीचा जुना वापरता काळ्या रंगाचा कि-पॅड मोबाईल कि. अं. ५००/-रू, असा एकुण १७,५००/- रू असा मुद्देमाल मिळुन आला. यातील नमुद आरोपीताने मा. गृह विभाग महाराष्ट्र शासन त्यांचे अधिसुचनेचे व सह पोलीस आयुक्त नागपुर शहर यांचे मनाई आदेश कलम ३७(१) मुपोकाचे उल्लंघन करून आपले ताब्यात विनापरवाना अवैध रित्या वरील नमुद वर्णनाचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतले. नमुद आरोपीताचे हे कृत्य गुन्हा कलम ३, २५ भा. ह. का. सह कलम १३५ मु.पो. का. प्रमाणे होत असल्याने गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली. सदर कामगिरी मा. श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) गुन्हे शाखा, श्री. मनोज सिडाम, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) अति, कार्य यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक किशोर पर्वते यांचे नेतृत्वात सपोनि रियाज मुलाणी, पोलीस अमलदार श्रीकांत साबळे, सुरज भारती, पंकज तांबडे, सुनिल वानखेडे, जितेन्द्र दुबे, पंकज लांडे, हिमांशु ठाकुर, प्रफुल्ल पारधी, गोपाल यादव, चालक विकास चहादे यांनी केली.