18 वर्षाच्या मुलाने अख्ख कुटुंबच संपवले ; हे होते त्या मागील कारण
कुटुंबीय नरभक्षक असल्याचे सांगत केली हत्य
तरुणाई भरकटत असल्याचे अनेक घटनांवरून समोर येत आहे. मुले तरुण झाली की आईवडिलांचे लक्ष त्यांच्या वरून कमी होते. कारण तरुण मुलं आपला वेळ कुटुंबियांपेक्षा मित्र मैत्रिणी बरोबर जास्त घालवतात. त्यामुळे आपला मुलगा किंवा मुलगी नेमकं काय करीत आहेत. याबद्दल त्यांना काहीच कल्पना नसते. आईवडिलांना काही कल्पना आल्यास ते त्यावर उपाययोजना करू शकतात. पण त्यांना त्याबद्दल काही माहीतच नसते . तरुण मुलांच्या मानसिकतेवर झालेल्या परिणामाचा भयंकर रिझल्ट पाहायला मिळत आहे. टेक्सासमध्ये घडलेल्या या प्रकरणानंतर तरुनाईच्या मानसिकतेबद्दल कल्पना येईल.
अशातच टेक्सासमध्ये एका 18 वर्षाच्या मुलाने त्याचे आख्ख कुटुंबच संपवलं आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये (texas) एका 18 वर्षीय मुलाला त्याच्याच कुटुंबातील सदस्यांची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हत्येचे कारण ऐकून मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे.
टेक्सासमध्ये 18 वर्षीय तरुणाने आपल्याच कुटुंबियांतील चार जणांची हत्या केली आहे. मृतांमध्ये तरुणाचे आई-वडील आणि मोठी बहीण आणि पाच वर्षांच्या भावाचा समावेश आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, सीझर ओलाल्डे असे या तरुणाचे नाव आहे. सीझर दावा आहे की त्याचे कुटुंबीय नरभक्षक होते आणि ते त्याला खाऊन टाकणार होते. त्यामुळे त्याने सगळ्यांची निर्घृणपणे हत्या केली.
पोलिसांनी माहिती मिळाली की एक तरुण आपल्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता सीझरने स्वत:ला घरात कोंडून घेतले होते. पोलिसांना घरामध्ये चौघांचे मृतदेह पडले असल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी संशयित सीझरला अटक केली. सीझर त्यानंतर पोलिसांना सांगितले की, मीच माझ्या कुटुंबीयांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलिसांनी त्याचे आई वडिल रिबेन ओलाल्डे आणि आयडा गार्सिया, मोठी बहीण लिस्बेट ओलाल्डे आणि लहान भाऊ ऑलिव्हर ओलाल्डे यांचे मृतदेह बाथरूममधून बाहेर काढले.
सीझरची आई बराच वेळ कामावर न आल्याने तिचा एक सहकारी कारण विचारण्यासाठी ओलाल्डे कुटुंबियांच्या घरी पोहोचला होता. मात्र सीझर बंदूक दाखवून त्याला अडवले. त्यावेळी सीझरने सांगितले की, मी माझ्या कुटुंबाला नरभक्षक असल्याने मारले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांवर घराच्या वेगवेगळ्या भागात गोळ्या झाडण्यात आल्याचे दिसून आले आहे. यानंतर त्यांना ओढत बाथरूममध्ये नेण्यात आले. याशिवाय घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गोळ्या विखुरल्या होत्या. तसेच घरात रक्तच रक्त सांडले होते. दुसरीकडे शेजाऱ्यांच्य म्हणण्यानुसार ओलाल्डे कुटुंबिय चांगले होते. त्यांच्या मुलाने हे सर्व का केले याबद्दल मात्र काही माहिती नाही.