सामाजिक

घाटंजी स्वामी समर्थ केंद्र येथे दत्त जयंती निमित्त पारायण व महाप्रसादास जनसागराची गर्दी

Spread the love

 

घाटंजी तालुका प्रतिनिधी –
दत्त जयंती उत्सव निमित्ताने स्वामी समर्थ सेवा केंद्रात भक्तांची मांदियाळी पहायला मिळाली. दत्त अवतार व स्वामी समर्थ व गुरु चरित्र सोबतच दत्त पारायणात घाटंजीतील स्वामी समर्थ मंदीरात भाविकांणी सात दिवस गर्दी केली होती.सकाळी 4 ते रात्री 8 पर्यंत गुरु चरित्र,हरिनाम,दत्त पारायण,दूर्गा सप्तसती, चंडीयाग होम हवन सोबत अध्यात्म आणि विज्ञान यातील सांगड घालत उत्तम जिवन जगण्याचा मार्ग या केंद्र मार्फत दैनंदिन चालू होता सोबतच दत्तजयंती समाप्ती निमित्ताने 27/12/23 ला भव्य महाप्रसादाचे आयोजन या केंद्रात करण्यात आले त्यासाठी महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी भक्तीचा जनसागर उसळला या सात दिवसांचे आणि दत्तजयंतीचे कालावधीत केंद्रात विधीवत पुजा अर्चनात भाविक तल्लीन झाले. या कार्यक्रमासाठी सचिन भेंडारकर,सायरे, प्रविण कर्णेवार,सारंग कहाळे, जगदीश बोढाले व इतरही सहकारी आणि स्वामी समर्थ सेवा केंद्र पदाधिकारी मोलाचे परिश्रम घेत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close