Uncategorized
सायफळ येथील डिपीची बिकट अवस्था सतत होत आहे स्पार्किंग

घाटंजी ता प्रतिनिधि-
घाटंजी तालुक्यातील पारवा ३३ के व्ही उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या सायफळ येथील कृषी पंपाला विज जोडणी देणा-या डि पी ची अवस्था फार बिकट झाल्याचे दिसून येत आहे मात्र सदर डीपी दुरूस्ती किंवा नविन डीपी बसविण्याकडे महावितरणचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे सदर डिपी पासून सायफळ येथील अनेक कृषी पंपाला विज पुरवठा करण्यात येते मात्र या डीपीची अवस्था बिकट झाल्याने शेतक-यांना विजेच्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे सदर डीपी मधील ग्रिप हे खराब झाले असल्याने कृषी पंपाला सप्लाय देणारा केबल वारंवार जळून खाक होत आहे यामुळे शेतक-यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे याकडे पारवा येथील ३३ के व्ही उपकेंद्राचे कनिष्ट अभियंता लक्ष देऊन डी पी दुरूस्ती करावी अशी मागणी शेतक-यांकडून होत आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1