क्राइम

स्वानाने लावला बलात्कारी तरुणाचा पत्ता

Spread the love
संबळ / विशेष प्रतिनिधी
                घराच्या बाहेर खेळणारी एक सहा वर्षाची मुलगी अचानक गायब झाली. घरांच्यांनी शोध घेतल्यावर ती कुठेच आढळली नाही. शेवटी अनेक प्रयत्नांनंतर ती घरापासून जवळपास 300 मीटर जंगलाच्या बाहेर बेशुद्धावस्थेत आढळली. पाच दिवस उलटून देखील आरोपीचा शोध लागत नव्हता. शेवटीं पोलिसांनी मेरी नावाच्या प्रशिक्षित कुत्र्याची मदत घेतली. आणि मेरीने आरोपीला शोधून काढले. यासाठी मेरीला 10 हजार रूपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरवले आहे. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील ही घटना आहे.
जंगलाजवळ बेशुद्धावस्थेत
मिळालेल्या माहितीनुसार, एक सहा वर्षांची मुलगी 18 जून रोजी घराबाहेर खेळण्यासाठी गेली होती. ती बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. शोध मोहिमेदरम्यान ही मुलगी घरापासून सुमारे 300 मीटर अंतरावर जंगलाजवळ बेशुद्धावस्थेत आढळून आली. कुटुंबीयांनी तिला तातडीने सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्याच रात्री घटनास्थळ सील केले आणि दुसऱ्या दिवशी फॉरेन्सिक टीमने तेथून पुरावे गोळा केले, ज्यात एक गमछा जप्त करण्यात आला. त्यानंतर पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
‘मेरी’ने असा शोधला आरोपी
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिश्नोई यांनी श्वान पथकाला पाचारण केले. गुन्ह्याच्या
श्वान पथकाला पाचारण केले. गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेला गमछा पोलीस श्वान ‘मेरी’ला हुंगवण्यात आला. त्या कपड्याचा वास घेताच मेरीने शेतातून आणि जंगलातून मार्ग काढत एका विशिष्ट दिशेने धाव घेतली आणि ती पोलीस पथकाला थेट संदीप नावाच्या तरुणाच्या घरापर्यंत घेऊन गेली. पोलीस तिथे पोहोचले तेव्हा कुटुंबीयांनी संदीप घरात नसल्याचा दावा केला. मात्र, पोलिसांच्या हालचालींची कुणकुण लागताच त्याने तिथून पळ काढल्याचे तपासात समोर आले. यानंतर पोलिसांनी  तातडीने नाकाबंदी केली आणि संशयिताचा शोध घेत असताना आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून एक गावठी कट्टाही जप्त केला आहे.
विशेष सन्मान
पोलिसांनी सांगितले की, मेरी ही तिच्या बॅचची सुवर्णपदक विजेती श्वान असून तिने यापूर्वीही अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल केली आहे. बिलासपूरच्या जंगलातील खून प्रकरण आणि संभल येथील एका अज्ञात हत्या प्रकरणाचा छडा लावण्यातही मेरीने पोलिसांना महत्त्वपूर्ण सुगावा मिळवून दिला होता. यावेळी बलात्काराच्या आरोपीपर्यंत पोहोचण्यात तिची भूमिका निर्णायक ठरल्याने तिचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. वैज्ञानिक तपास, फॉरेन्सिक पुरावे आणि श्वान पथकाच्या मदतीने या प्रकरणाच यशस्वी खुलासा करण्यात आला असून आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close