क्राइम

रेल्वे स्थानक परिसरात तरुणीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार 

Spread the love

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कौतुकास्पद कारवाई 

वर्धा /विशेष प्रतिनिधी 

                     मुळची उमरेड तालुक्यातील सोनेगाव (बेला) येथील रहिवाशी 19 वर्षीय तरुणी  चंद्रपूर येथील आपल्या काकांकडे गेली होती.  परत  घरी जाण्यासाठी निघालेल्या तरुणीवर वर्धा येथील स्टेशन वर पोहचताच एका संशयिताने तिला गाठले.आपल्या ऑटोत बसवले.दरम्यान त्याने आपल्या चार साथीदारांना बोलावून घेत तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. वर्धा लोहमार्ग पोलिसांना याबद्दल समजताच त्यांनी घटनेचे गांभीर्य जाणून तात्काळ पावले उचलत 13 संशयितांना ताब्यात घेतले. तरुणीसमोर उभे केले असता त्याने त्यातील पाच लोकांना लगेच ओळखले. पोलिसांनी त्या पाच आरोपींवर बीएनएस नुसार गुन्हे दाखल करून अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक करणाऱ्या लोहमार्ग पोलिसांचे कौतुक होत आहे.

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील पीडित तरुणी मंगळवारी तिच्या वडिलांच्या मदतीने सोनेगाव (बेला) बसस्थानकावरून चंद्रपूरला काकांकडे जाण्यासाठी निघाली होती. चंद्रपूरहून परतताना बुधवारी रात्री तिने जयंती एक्स्प्रेसने प्रवास केला आणि मध्यरात्री सेवाग्राम रेल्वे स्थानकावर उतरली. तेथून तिने वर्धा रेल्वे स्थानक परिसरासाठी एक ऑटो रिक्षा पकडली.
वर्धा रेल्वे स्थानक भागात पोहोचताच एका संशयिताने तिला गाठून ऑटोमध्ये बसवले आणि आपल्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतर या पाच जणांनी मिळून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.गुरुवारी पहाटे 4:00 वाजता या घटनेची गोपनीय बातमी लोहमार्ग पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवून गुरुवारी दुपारी 3:00 वाजता तरुणीला शोधून काढले. तिची चौकशी करून तिच्या वडिलांना सुरक्षितपणे बोलावण्यात आले.

तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी परिसरातील 12 ते 13 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पीडित तरुणीने त्यापैकी 5 मुख्य आरोपींची अचूक ओळख पटवली आहे.नागपूर लोहमार्ग पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या ओळखीनंतर पाचही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 70(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्धा लोहमार्ग पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close